सोलापुरची मान उंचावणारी कन्या – डॉ. अश्विनी निलकंठ राठोड यांना पीएच.डी. पदवी

ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग व ऑडिटिंग क्षेत्रातील सखोल संशोधनाला मिळाली सर्वोच्च शैक्षणिक मान्यता

सोलापूर | प्रतिनिधी

सोलापूरची कन्या आणि रिटायर्ड डीवायएसपी निळकंठ राठोड यांची सुपुत्री डॉ. अश्विनी निलकंठ राठोड यांनी शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन करत संपूर्ण सोलापूरचा मान उंचावला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून “Human Resource Accounting and Auditing Practices with Special Reference to Western Maharashtra” या विषयावरील त्यांच्या सखोल व अभ्यासपूर्ण संशोधनासाठी विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी विद्यापीठात पार पडलेल्या मौखिक सादरीकरणात डॉ. राठोड यांनी आपल्या संशोधनातील मोलाचे निष्कर्ष प्रभावी शब्दांत मांडले. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आणि ऑडिटिंग पद्धतीतील विद्यमान अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि भावी सुधारणा यावर त्यांनी अत्यंत बारकाईने प्रकाश टाकत ठोस सुधारणा सुचविल्या. त्यांचे हे संशोधन, केवळ शैक्षणिक नाही तर धोरणात्मक मार्गदर्शन करणारे ठरले आहे.

या प्रबंधाला दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांचे कसून मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनतीचा, चिकाटीचा आणि अभ्यासू वृत्तीचा शैक्षणिक वर्तुळातून सर्वत्र गौरव होत आहे.

डॉ. अश्विनी राठोड यांच्या यशावर महाविद्यालयीन, विद्यापीठीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे सोलापूरच्या शैक्षणिक तेजात एक नवा सोनेरी अध्याय लिहिला गेला आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!