सातारा शहरालगत महामार्गावरील मलाबार लॉजिंग ॲन्ड बोर्डींग येथे कुंटणखाना चालवणारे दोन जणांना अटक

चालविणारे दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा शहरालगत महामार्गावरील मलाबार लॉजिंग ॲन्ड बोर्डींग येथे कुंटणखाना

चालविणारे दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी

सातारा जिल्हयात बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई

करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्याअनुशंगाने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके यांना सातारा जिल्हयात बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

दि. २४/०७/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, दोन इसमांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील पूजा पेट्रोल पंप शेजारी असणारे मलाबार लॉजिंग अॅण्ड बोर्डींग या लॉजवर वेश्यागमनाकरीता मुली ठेवल्या आहेत व ते मागणी केले प्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवितात. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी जावून छापा टाकून वेश्यागमनाचा मोबदला स्वतःच्या उपजिविकेसाठी स्विकारुन, पिडीत महिलांना ग्राहकांसाठी वेश्यागमनासाठी उदयुक्त करून, वेश्या व्यवसायाच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहून, वेश्या व्यवसायास प्रेरणा देणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेतले व त्यांचे विरुद्ध सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं. ३२५/२०२३ भा.द.वि.कलम ३७० (१) (२) (३), ३४ सह मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४,५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, पोलीस अंमलदार दिपक मोरे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, ओंकार यादव, पंकज बेसके, पंकजा जाधव, मोनाली निकम, माधवी साळूंखे, क्रांती निकम, आदिका वीर, अनुराधा सणस यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!