सातारा वनविभागाची धडाकेबाज कारवाई: पाटण वनपरिक्षेत्रात वणवा लावणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल


सातारा वनविभागच्या पाटण वनपरिक्षेत्रात वणवा लावणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत दोन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाटण तालुक्यातील मरळी आणि घेरादातेगड (काटेवाडी) येथील राखीव वनक्षेत्रात घडलेल्या या घटनांमुळे सुमारे १-१ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले होते. वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वणवे नियंत्रणात आणले.
दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मरळी येथील फॉ. के. नं. ५०६ मध्ये वणवा लावल्याप्रकरणी बळवंत विठ्ठल कदम (रा. मरळी, ता. पाटण, जि. सातारा) याच्यावर वनगुन्हा नोंदविण्यात आला. तर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेरादातेगड (काटेवाडी) येथील फॉ. कं. नं. ४५८ मध्ये वणवा लावल्याप्रकरणी लक्ष्मी कृष्णत मांडवकर (रा. घेरादातेगड, ता. पाटण, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून संबंधित गुन्ह्यासाठी एक वर्षांपर्यंत कारावास किंवा रु. ५,००० पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
नागरिकांना आवाहन करताना वनविभागाने सांगितले की, अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, अवैध शिकार, राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण किंवा वणवा लावणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश नलवडे, वनपाल निलेश कुंभार तसेच वनरक्षक मेघराज नवले, निखिल कदम, रोहित लोहार, अयोध्या रन्हेर आणि वनमजूर रमेश कदम व संजय जाधव यांच्या पथकाने केली.
वनसंवर्धनासाठी सातारा वनविभागाने घेतलेली ही कडक भूमिका नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!