सातारा पोलीस रेकॉर्डवरील आरोपीकडून ७० हजार किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतूसे हसतगत

सातारा पोलीस रेकॉर्डवरील आरोपीकडून ७० हजार किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतूसे हसतगत

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी बेकायदा बिगर परवाना स्वतःचे जवळ पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्या अनुशंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, अमित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन त्यांना अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.

दि.१८/०८/२०२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी अभिषेक संजय पाटोळे रा. शिवाजी स्टेडीयम झोपडपट्टी कराह ता.कराड जि.सातारा हा हजारमाची गावचे हद्दीत पिस्टल विक्री करण्याकरीता येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांचे पथकास देवून त्यांना नमुद इसमास ताब्यात घेवून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. नमुद तपास पथकाने हजारमाची ता. कराड गावचे हद्दीतील डिपात ओढ्याजवळील स्मशानभुमी जवळ जावून सापळा लावून बातमीमधील इसमास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये ७०,४००/- रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली असून त्याचे विरुध्द कराह शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १६७ / २०२३ भारतीय हत्यार अधिनियम ३, २५ अन्वये नोंद केला आहे.

आहेत.

माहे नोव्हेंबर २०१२ पासून एकूण ३९ देशी बनावटीची अग्निशस्त्रे व ५५ काडतुसे जप्त करण्यात आलेली

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लेलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, अमित झेंडे, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, गणेश कापरे, मोहन पवार, अमित सपकाळ, मनोज जाधव, विक्रम पिसाळ, ओंकार यादव, विशाल पचार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, मयुर देशमुख, वैभव सावंत, मोहसिन मोमीन, संकेत निकम, शिवाजी गुरव, संभाजी साळूंखे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!