
सातारा पोलिसांची डिजिटल पुढाकार! नागरिकांसाठी २४x७ ‘CUG’ मोबाईल सेवा सुरु
सातारा, २३ मे २०२५ –
सातारा जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस विभागाशी थेट आणि तत्काळ संपर्क साधता यावा, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून ‘कॉमन युजर ग्रुप (CUG)’ सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
या सेवेअंतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक पोलीस ठाणे, उपविभागीय अधिकारी, शाखा प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांना विशेष मोबाईल हँडसेट आणि CUG क्रमांक देण्यात आले आहेत.

या माध्यमातून नागरिक आता कोणत्याही वेळी – २४x७ – संबंधित पोलीस स्टेशनला आपली तक्रार, सुचना अथवा महत्वाची माहिती SMS किंवा WhatsApp द्वारे पाठवू शकतील.
हा उपक्रम सामान्य जनतेशी थेट संवाद वाढवून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
महत्त्वाचे:
– ही सेवा फक्त शासकीय कामकाजासाठीच उपलब्ध आहे.
– नागरिकांनी फसव्या अथवा चुकीच्या तक्रारी टाळाव्यात.
– तक्रार देताना स्पष्ट माहिती आणि ठिकाणाचा उल्लेख करावा.
सातारा जिल्हा पोलीस दलाचा हा डिजिटल आणि पारदर्शक उपक्रम नागरिकांसाठी एक मोठे पाऊल ठरला असून, आता पोलिसांना माहिती देणे अधिक सोपे, जलद आणि परिणामकारक होणार आहे.
