सातारा पुणे महामार्गावर वाहनांचा महापूर (व्हिडिओ)

महामार्गावर वाहनांचा महापूर( व्हिडिओ रिपोर्ट प्रवीण गाडे वाई)

गणेशोत्सवासाठी गावी आलेले चाकरमाने पुन्हा नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. आनेवाडी टोलनाका, खंबाटकी बोगदा, खंबाटकी घाट परिसरात महामार्ग अनेकदा ब्लॉक झाला.

वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. घरगुती उत्सवातील बहुतांश गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी गौराईसोबत विसर्जन झाले. त्यामुळे अनेक चाकरमानी पुणे-मुंबईकडे कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सातारा जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या गावावरून माघारी निघाले. त्यामुळे महामार्गावर वाहनांचा महापूरच वाहत असल्याचे दिसून आले.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!