
सातारा टायगर्स टीमने डेक्कन क्लिफहॅंगरमध्ये पटकावला विजय!
सातारा : सातारा टायगर्स टीमने पुणे ते गोवा दरम्यान होणाऱ्या डेक्कन क्लिफहॅंगर सायकलिंग इव्हेंटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे आणि RAAM स्टाईल रिले मध्ये पहिलं स्थान पटकावले आहे. 643 किमी लांबच्या या रूटवर, 4-सदस्यीय सायकलिंग टीमने 24 तास 45 मिनिटांच्या अविश्वसनीय वेळेत पूर्ण प्रवास केला.
सातारा टायगर्सच्या टीमने 650.47 किमी अंतर पार करत आणि 4,916 मीटर उंची गाठत, आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी घेतली. या शर्यतीमध्ये 26.3 किमी/तास सरासरी वेगाने सायकलिंग करत, त्यांना 16,294 कॅलोरी खर्च करण्यास भाग पाडले. या ऐतिहासिक कामगिरीला टीमच्या अथक प्रयत्नांमुळे यश आले.
टीम सदस्य – संतोष शेडगे, कृष्णा सोनमळे, संदिप सोनमळे आणि महेश साळूंखे पाटील यांच्या एकजुटीने या विक्रमात भाग घेतला. त्यांच्यासोबत सपोर्ट क्रू सदस्य विवेक देशमूख, शुभम किरवे, हणमंत निकम आणि सोहम शिंदे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. याशिवाय, सायकल रिपेरिंग आणि फिटींगची काळजी घेत असलेले अखिल सय्यद आणि मार्गदर्शक हेमल उपाध्ये यांचेही टीमने आभार व्यक्त केले.
या शर्यतीत सहभागी होण्याच्या प्रेरणेसाठी Inspire India तसेच सातारा सायकलिंग क्लब आणि Sahyadri Randonneurs च्या टीमचे विशेष आभार मानले. तसेच, त्यांच्या सर्व सायकलिंग मित्रांचेही धन्यवाद दिले.
सातारा टायगर्सच्या या यशाने सायकलिंग प्रेमींमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे आणि हा विजय केवळ एका शर्यतीतील यश नाही, तर जिद्द, चिकाटी आणि टीमवर्कचा प्रतिक आहे.
या ऐतिहासिक विजयाचे उत्सव बोगमालो बीचच्या सुंदर किनाऱ्यावर साजरे केले आणि या विजयामुळे टीमच्या आनंदात दुग्णिती झाली आहे. सातारा टायगर्सच्या या अपूर्व यशाने सायकलिंग विश्वात एक नवीन कीर्ती निर्माण केली आहे.