सर्वसामान्य जावळीकरांचा जनाधार सदैव पाठीशी असल्यामुळे , कोणत्याही राजकीय आव्हानांची भीती बाळगत नाही: आ शिवेंद्रराजे भोसले

सर्वसामान्य जावळीकरांचा जनाधार सदैव पाठीशी असल्यामुळे , कोणत्याही राजकीय आव्हानांची भीती बाळगत नाही: आ शिवेंद्रराजे भोसले

पाचगणी ता:२५:विकासकामे करत असताना ते गाव किती लोकसंख्येचे आहे, याचा कधीच विचार केला नाही.स्व. भाऊसाहेब महाराज यांनी दिलेल्या शिकवणीनुसार विकासकामे करताना कधीच दुजाभाव केला नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने जावळी तालुक्यात वाड्या-वस्त्यांवर लोकांच्या मागणीनुसार कामे केली आहेत. सर्वसामान्य जावलीकरांचा जनाधार माझ्या सदैव पाठीशी भक्कमपणे असल्याने कोणत्याही राजकीय आव्हानांची भीती बाळगत नाही . असा आत्मविश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला .

चार ते पाच दिवसापूर्वीचच जावळी तालुक्यात राष्ट्रवादीने मेढा केळघर विभागामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्ती प्रदर्शनकेले होते यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता शरद पवारांनी आदेश दिला तर जावळी मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा सुतोवाच केले होते यावरच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता सूचक इशारा दिलाय
मुकवली (ता:जावळी) येथे व्यायामशाळा उद्घाटन व विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी आमदार भोसले बोलत होते. यावेळी सुनील जांभळे, संतोष कासुरडे, विकास ओंबळे, उपसरपंच साहेबराव पवार, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पवार, विजय पवार यांची उपस्थिती होती.यावेळी आमदार भोसले म्हणाले, जावळी तालुक्यासाठी महत्वाच्या असलेले बोंडारवाडी धरण एक टीएमसी क्षमतेचे व्हावे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. हे धरण मार्गी लागल्यास स्थानिक युवकांना रोजगार मिळणार असून पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे.विकासकामामुळे माझी जावळीतील जनतेशी नाळ जोडली असून मला निवडणुकीतील आव्हानांची भीती नाही. ग्रुप ग्रामपंचायत मुकवली येथे जल जीवन मिशन योजनेतून ५०लाखांचा निधी दिला असून अंतर्गत रस्त्यासाठी २०लाख रुपये निधी देण्यात आला आहे. महाबळेश्वर ला जोडणाऱ्या वाहिटे रस्त्याचा प्रश्नही लवकर मार्गी लावला जाईल.जावळी तालुका राज्यात विकासकामांच्या बाबतीत रोल मॉडेल करणार असून विकासकामे करणाऱ्या लोकप्रतीनिधीला जावळी तालुक्याने साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार भोसले यांचे मुकवली ग्रामस्थांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले.व्यायामशाळा उद्घाटन करण्यात आले.मुकवली गावाला भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विजय पवार यांनी आमदार भोसले यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. गणेशोत्सव निमित्त मुकवली येथील गणेशोत्सव मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.या कार्यक्रमास मुकवली, वाटंबे,वाहिटे व परिसरातील ग्रामस्थ,युवक उपस्थित होते.
मुकवली:विकासकामांच्या प्रारंभापसंगी

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!