
स्वर्गीय विजय मोहिते काका यांचा 18 वा स्मृतिदिन, श्रद्धांजली अर्पित
सातारा : स्वर्गीय विजय मोहिते काका यांच्या 18 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनातील कष्ट, समर्पण आणि योगदानाला जावळी तालुक्यातील जनतेकडून व प्रतापगड सहकारी साखर कारखाना समूह कुडाळ परिसराकडून कैलासवासी काका आणि भैय्यांच्या कार्यकर्त्यांकडून व तमाम जावळी तालुक्याच्या वतीने आदरांजली अर्पित करण्यात आली.
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन अध्यक्ष माजी आमदार श्री. कैलासवासी लालसिंग राव काका, स्वर्गवासी श्री. राजेंद्र भैय्या यांच्यासमवेत त्यांनी जावळी तालुक्यातील एकमेव असणारा सहकाराचा मानबिंदू सोनगावच्या माळावर प्रतापगड सहकारी साखर कारखाना निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले
कैलासवासी विजय मोहिते काका हे एक असे नेतृत्व होते जे नेहमीच खंबीर पायांवर उभे राहून समाजाच्या सेवेसाठी कार्यरत होते. त्यांचे जीवन संघर्षमय होते, त्यांना प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत नेहमीच नवीन विचारांची आणि योजना राबवण्याची प्रेरणा होती. प्रतापगडाचा कारभार देखील त्यांनी काही वर्ष सांभाळला होता कैलासवासी काकाभय्यांनी सहकारी संस्था कारखाना उभा करण्यासाठी त्यांनी स्वतःचे जीवन समर्पित केले प्रतापगड कारखाना निर्मिती प्रसंगी व सुरुवातीच्या काळामध्ये मोहिते काकांनी कैलासवासी भैय्यांबरोबर संपूर्ण जावळी महाबळेश्वर रायगड परिसर शेअर्स गोळा करण्यासाठी पिंजून काढला होता त्याकाळी जावळी तालुक्यात एकमेव सहकाराचा प्रचंड मोठा साखर कारखाना निर्माण करण्यासाठी कैलासवासी राजेंद्र शिंदे यांनी
पायात भिरभिरकिट लावून दिनरात मेहनत करत होते. त्यांच्या या मेहनतीला कैलासवासी मोहिते काकांची मोलाची साथ लाभली होती
कैलासवासी विजय मोहिते काका यांच्या स्वप्नाला प्रतापगड सहकारी साखर कारखाना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माजी आमदार कैलासवासी श्री. लालसिंग राव काका आणि श्री. कै राजेंद्र भैय्या एकत्रितपणे त्यांनी योगदान दिले. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज प्रतापगड साखर कारखान्याच्या समूहाला व तालुक्याला अभिमान वाटणारा प्रतापगड कारखाना उभा राहिला आता प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सौरभ बाबा जावळी साताराचे कार्यसम्राट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने यांच्या मदतीने अजिंक्य प्रतापगड उद्योग समूहाच्या माध्यमातून यशस्वीपणे जावळी तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांची सेवा करत आहेत
प्रतापगड सहकारी साखर कारखाना आता ताठ मानेने सोनगावच्या माळावर उभा आहे, व पूर्ण क्षमतेने सुरू आहे जो स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.
आज कैलासवासी मोहिते काकांच्या, 18 व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने, त्यांच्या कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. कै मोहिते काका यांच्या कार्याच्या अविस्मरणीय आठवणींनी आजही त्यांच्या कुटुंबाला आणि जावळी तालुक्याला प्रेरणा दिली आहे.
कै विजय मोहिते काका यांच्या संघर्षशील जीवनाचा आदर्श आजही तालुक्याच्या जनतेच्या सर्वांसमोर आहे. त्यांचे कार्य आणि जीवनक्षेत्र हा आपल्या तालुक्याचा गहिरा ठेवा आहे.
🌹स्व. विजय मोहिते काका यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. 🙏