💥
“वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे!”
महिलांच्या एल्गार निदर्शनेत प्रचंड रोष – आरोपींना शिक्षा, वकीलाची सनद रद्द करण्याची मागणी!

सातारा | प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी पुण्यात महिलांनी प्रखर निदर्शने केली. समाजमनाला हादरवणाऱ्या या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेच्या चारित्र्यावर मृत्यूनंतर टीका करणाऱ्या वकील विपुल दुशिंग याची वकिली सनद रद्द करावी, अशी जोरदार मागणी आंदोलनातून करण्यात आली.
या निदर्शनांमध्ये साताऱ्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्याया या घटनेचा निषेध उपस्थित महिलांनी व्यक्त केला यावेळी सातारा जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे ,रेणू येळगावकर ,सुनीशा शहा ,जयश्री शेलार माजी नगरसेविका सुवर्णा पाटील, सीमा गायकवाड ,नंदिनी गायकवाड ,सीता चव्हाण, आदी महिला उपस्थित होत्या
आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सहभाग होता आदी महिला यांनी याबाबत आवाज उठवला आहे
या सर्वांनी “वैष्णवीच्या आत्म्यास शांतता मिळण्यासाठी आरोपींना जन्मठेप व्हावी आणि मृत महिलेच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप करणाऱ्या वकीलाची वकिली बंद करावी” अशी एकमुखी मागणी जोरदार निदर्शनांतून मांडली.
🔥 महिलांचा एल्गार – “बेटी के न्याय का अपमान नहीं सहेंगे!”
वकील विपुल दुशिंग याने दिलेल्या बेताल विधानांमुळे संतप्त झालेल्या महिलांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली. “चार कानाखाली मारलं म्हणजे हिंसाचार नाही?” – असा पुरुषसत्ताक दृष्टिकोन मांडणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी आंदोलनात झाली.
कायदा आणि नैतिकतेचा अपमान करणाऱ्यांना माफ नाही!
या आंदोलनात सहभागी महिलांनी असा इशारा दिला की, जर समाजात महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना वाचवण्यासाठी काही वकिलांनी असेच पातळीखालील वर्तन केले, तर त्यांचाही प्रतिकार तीव्र स्वरूपात करण्यात येईल.
.