शेद्रे ते अतीत दरम्यान महामार्ग वाहतूक कोंडीत अडकलेली ‘विकासाची गाडी’ – यंत्रणांचा भोंगळ कारभार नागरिकांच्या नाकी नऊ!

शेद्रे ते अतीत दरम्यान महामार्ग वाहतूक कोंडीत अडकलेली ‘विकासाची गाडी’ – यंत्रणांचा भोंगळ कारभार नागरिकांच्या नाकी नऊ!

सातारा (प्रतिनिधी) –
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेद्रे ते अतीत दरम्यानची अवस्था म्हणजे अक्षरशः वाहनचालकांच्या संयमाची कसोटी! गेल्या दोन वर्षांपासून याच ठिकाणी दररोज दहा ते पंधरा किलोमीटर लांब वाहतुक कोंडीचा शोकांत नाट्य रंगत आहे, आणि अद्याप ना पोलीस प्रशासन जागं झालं, ना रस्ते विकास महामंडळाला जाग आली!

उड्डाणपुलांची रखडलेली कामं, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, आणि ढिसाळ पोलीस यंत्रणा यामुळे वाहनचालकांना रोजच अर्धा ते दीड तास शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कोल्हापूरवरून टोल भरायचा, आणेवाडीत पुन्हा टोल द्यायचा, आणि मध्ये अडकायचं ‘कोंडीच्या खड्ड्यात’ – ही आहे सध्याची शोकांतिका!

🛑जिल्हाधिकारी गप्प?

साताऱ्यात नव्याने नियुक्त झालेले जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचं याकडे अद्यापही लक्ष गेलेलं दिसत नाही. जिल्ह्यातील हजारो नागरिक, व्यवसायिक आणि विद्यार्थी दररोज या महामार्गावरून प्रवास करत असताना, ‘वाहतूक कोंडी’ ही आता रूटीन बाब झाली आहे. सामान्यांच्या नाडीवर बोट ठेवणं हे प्रशासनाचं कर्तव्य असतं, पण येथे तर ‘कर्तव्य विसरलेली यंत्रणा’ अशी परिस्थिती आहे.

🛑भोंगळ नियोजन, रखडलेली कामं आणि नागरिकांची होरपळ

राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम दोन वर्षांपासून रखडलंय. रस्ते विकास महामंडळाकडून वेळकाढूपणा आणि निष्क्रीय दृष्टीकोन यामुळे विकासाचं चाकच थांबलं आहे. स्थानिक वाहतूक पोलीसही फक्त उभे राहताना दिसतात – नियोजन, पर्यायी रस्ता, नियंत्रण काहीच नाही!

‘🛑महाग टोल – खड्डे आणि कोंडीची सोबत’ – हीच सध्याची सेवा

सर्वसामान्य वाहनचालक टोल भरतोय – पण बदल्यात काय मिळतंय? खड्डे, गोंधळ, कोंडी आणि तासनतास वेळ वाया! महत्त्वाचं म्हणजे, यामुळे प्रवास करताना अपघाताचाही धोका वाढला आहे.


“हा महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग राहिला नसून, नागरिकांच्या संयमाचा ‘कसोटी मार्ग’ बनलाय,” असा संताप सामान्यांमध्ये व्यक्त होतोय.

🛑प्रश्न स्पष्ट आहे:

शेंद्रे ते अतीत महामार्गावर कोंडीचं भूत उतरवणार कोण? जिल्हा प्रशासन, महामंडळ, की पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणारे संतप्त नागरिक?

🛑”टोल भरून त्रास घेण्याची ही कोणती योजना?”

“कोंडीत अडकलंय विकासाचं चाक!”

“दोन वर्षे झाली… शेंद्रे-अतीतचा हा गोंधळ अजूनही संपायचं नाव घेत नाही!”

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!