शिवजयंती उत्सव समिती तेटली – मुंबई याच्या वतीने मुलांना शालेय साहित्य वाटप (व्हिडीओ)

शिवजयंती उत्सव समिती तेटली – मुंबई याच्या वतीने मुलांना शालेय साहित्य वाटप



आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेटली या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त.इयत्ता १ ली ते ७ वी मधील सर्व विद्यार्थी तसेच अंगणवाडी मधील असणारी सर्व लहान मुले यांना शालेय शिक्षणासाठी लागणाऱ्या गरजेच्या प्राथमिक स्वरूपातील वस्तू परीक्षा पॅड आणि सोबत नेहमीच्या अभ्यासात लागणारे साहित्य तसेच लहान मुलांना टिफीन बॉक्स.अश्या प्रकारे साहित्य वाटप करण्यात आले.


या वेळी कार्यक्रमाला तेटली गावचे सरपंच / उपसरपंच / मा.सरपंच / पोलीस पाटील तसेच गावातील जेष्ठ आणि वरिष्ठ मंडळी उपस्थित होती.सोबत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ही उपस्थित होते

शाळा व्यवस्थापन समिती आणि आणि या ज्ञान मंदिरातील गुरुजन यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले यावेळी आणि शिवजयंती उत्सव समिती चे सल्लागार श्री.विष्णू भोसले , श्री.दिलीप शेठ भोसले , श्री.प्रकाश भोसले समितीचे सचिव श्री.दिनेश भोसले ,सहखजिनदार श्री.गणेश भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमाचे नियोजन समिती अध्यक्ष श्री.शिवाजी भोसले आणि सर्व समिती सदस्य आणि शिवभक्त यांनी एकत्र येऊन केले…

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!