शास्त्रीय भरतनाट्यम आणि सत्रिय नृत्य प्रकाराने सातारकर मंत्रमुग्ध.

सातारा 25..येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात गणेशोत्सवानिमित्त सातारा व पुणे येथील नृत्यांजली संस्थेच्या कलाकारांनी बहारदार भरतनाट्यम सादर केले .या कार्यक्रमाची सुरुवात शिवसूत गणेशाच्या चरणी अर्पण करणाऱ्या गणेश स्तुतीने केले.

.. महागणपतीम मनसा स्मराणी .. स्तुती स्वामी दिक्षितार या दक्षिणात्य विद्वानांनी ही रचना संस्कृत भाषेत आदि तालात नाट्य रागात बांधली होती .त्यावरील नृत्य अतिशय बहारदारपणे सादर झाली .त्यानंतर रूपक तालातील कीर्तन यामध्ये गणेशाच्या वर्णनाने विविध स्वर आणि तिरमान नटलेली रचना ज्यामध्ये गणेशाच्या देहाचे वर्णन केले आहे त्यात माथ्यावर शेंदूर, पोटाभोवती सर्प ,पाश, अंकुश, चंद्र धारण केलेल्या गणेशाला ही नृत्य वंदना अर्पण करण्यात आली

.त्यानंतर जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी रचलेल्या गणेश पंचरत्न स्तोत्रावर बहारदार नृत्य सादर करताना विघ्नहर्ता गणेशाला मोदक आवडतात ,तो शुभ गोष्टी सर्वांना देतो ,शत्रूंचा आणि विघ्नांचा नाश करतो व सर्वत्र आनंद प्रदान करतो अशा विघ्न राज्याचे सुरेख वर्णन वृत्तांतून सादर झाली.

स्वर आणि जाती यांचा समावेश असलेल्या किर्तन रचनेत पुराणातील कथा व त्याचे वर्णन यावेळी कलाकारांनी आपल्या नृत्यातून सादर केले. या कीर्तनांमध्ये भगवान शंकरांनी ..गंगावतरण ..कशा पद्धतीने केले ,याचे वर्णन ..महादेव शिवशंभो ..या रचनेवर रेवती रागात तालात बांधण्यात आले होते .या सर्व कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन गुरु सौ. वैशाली पारसनीस यांनी केले होते.नृत्यांजली संस्थेच्या वतीने भरतनाट्यम कार्यक्रमात निधीशा सालीयन ,अंकिता पांचाळ, श्रुती सोहनी कडुस्कर ,सानिका शहाणे काळे ,पूर्वा मेहता, मृण्मयी मेहंदळे अनुजा बोकील आणि पृथा टोणपे या कलाकार आपली कला सादर केली. नृत्यांजली संस्थेच्या ज्येष्ठ शिष्या गायत्री जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या पूर्वार्धातील कार्यक्रमानंतर गुरु सौ. वैशाली पारसनीस व सर्व कलाकारांचा सत्कार नटराज मंदिराच्या वतीने डॉ.संगीता कोल्हापुरे व सौ उषा शानभाग यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह मानपत्र व शाल श्रीफळ देऊन करण्यात आला त्यानंतर बहारदार अशा साताऱ्यात प्रथमच नटराज मंदिरात सादर होणाऱ्या सत्रिय या आणखी एक शास्त्रशुद्ध नृत्य प्रकाराचे सादरीकरण पुणे येथील आदी डान्स अकादमीच्या गुरु डॉ. देविका बोर ठाकूर व त्यांच्या 14 शिष्यांनी अतिशय बहारदारपणे सादर केले .
या कार्यक्रमांमध्ये आपल्या नृत्याची सुरुवात राम वंदना या कलाकृतीतून सादर करताना श्रीरामाच्या काही कथा, श्लोक, सीता स्वयंवर, श्री राम आणि परशुराम यांच्यातील मतभेद, सीता हरण आणि रावण वध या कथांचा समावेश नृत्यातून अतिशय बहारदारपणे सादर केला. त्यानंतर कृष्णलीला सादर करताना कृष्णा ने उचललेला गोवर्धन पर्वत आणि कालिया मर्दनाची कथा नृत्यातून सादर केली .भगवान श्री महाविष्णूंचे दशावतार जे आहेत त्याचे दर्शन या सत्रिय शास्त्रीय नृत्य प्रकारातून सादर करताना वैष्णव भक्तीची ओळख नृत्यातून आणि अभिनयाद्वारे कलाकारांनी उपस्थित त्यांना करून दिली. टाळ्यांच्या गजरात या सर्व नृत्याचे स्वागत करताना सातारकर उपस्थित प्रेक्षकांनी बोरथाल या थाळी वाजवत केलेल्या नृत्य प्रकारात कलाकारांनी झांज हातात घेऊन केलेले नृत्य तितकेच बहारदार झाले .आणि या कार्यक्रमाची सांगता झाली.देविका बोर् -ठाकुर यांचे समावेत अक्षता माने ,योशा रॉय, अनुराधा नलवडे, साक्षी गायकवाड आणि आदि डान्स अकादमीच्या कलाकार यांनीआपली कला सादर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .शुभदा महेश धामापूरकर यांनी केले. नटराज मंदिराचे वतीने उषा शानभाग , सातारा येथील जेष्ठ वास्तु शास्त्रज्ञ श्रीराम कुलकर्णी व त्यांच्या पत्नीच्या हस्ते या सर्व महिला नृत्य कलाकारांना सन्मानचिन्ह व गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अतुल देशपांडे यांनी केले .कार्यक्रमास नटराज मंदिराचे व्यवस्थापक श्री चंद्रन, नारायणराव ,अनिल वाळींबे डॉ. समीर सोहनी, श्री कोल्हापुरे, दत्ताजी काळे व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
===========================.