विजय असो ठेकेदाराचा… पण पावसात डांबरीकरणाचा पराभव निश्चित! वाईच्या डोंगराळ भागात भरपावसात ‘कागदी रस्ता’ निर्माण…! जनतेचा पैसा खड्ड्यात?(व्हिडीओ)

:

विजय असो ठेकेदाराचा… पण पावसात डांबरीकरणाचा पराभव निश्चित!

वाईच्या डोंगराळ भागात भरपावसात ‘कागदी रस्ता’ निर्माण…! जनतेचा पैसा खड्ड्यात?

वाई प्रतिनिधी |

वाई तालुक्यातील बांधकाम विभाग आणि त्यांचे लाडके ठेकेदार सध्या “विक्रम तोडण्याच्या” नव्हे तर “विश्वास मोडण्याच्या” स्पर्धेत उतरले आहेत. डोंगराळ आणि दुर्गम भागात, आळेवाट ते एकसर मार्गावर मुसळधार पावसाच्या तोंडावरच डांबरीकरण, खडीकरण, सीलकोट आणि कारपेटिंग सुरु करून एक नवा ‘रस्ता विनाश’ विक्रम घडवण्यात आला आहे.

हा रस्ता टिकणार आहे की उद्या ढासळणार? – हा प्रश्न सध्या गावकऱ्यांच्या ओठावर आणि प्रशासनाच्या गालावर जोरात बसलेला आहे.

“विजय असो विजय असो” अशा जयघोषात वावरणाऱ्या या ठेकेदाराने, भर पावसात दीड किमी रस्त्याचं लाखो रुपयांचं काम पूर्ण करून आता लाखो रुपयांचं बिल खायला तयार उभा आहे.
खडी उखडली आहे, डांबर विरघळलंय, आणि त्यात ठेकेदाराचा आत्मविश्वास मात्र एवढा की, जणू पावसालाच ‘किसमें कितना है दम’ असं आव्हान दिलं जातंय!

या रस्त्याच्या कामासाठी वाईचे कार्यसम्राट आमदार मकरंद आबा पाटील यांनी निधी मंजूर केला, ही बाब खरी असली तरी, त्याच निधीचा असा “वारा-पाण्यात उडवलेला” वापर, स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि खंत दोन्ही निर्माण करत आहे.

🛠️ बांधकाम विभाग गप्प! ठेकेदार खुश! आणि जनता त्रस्त!

या भागातील नागरिकांचा सवाल आहे, “हा निधी जर अशा निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने खर्च होणार असेल, तर जनतेचं काय?”
प्रशासन डोळेझाक करतंय, आणि ठेकेदार ‘काम पूर्ण’ असं दाखवून बिल लाटण्याच्या तयारीत आहे.

या घटनेवर बांधकाम विभाग अजूनही मौन बाळगून आहे, तर गावकरी डोक्यावर हात मारत म्हणतायत – “हा रस्ता नाही, आमचं भविष्य उध्वस्त करणारं कुंपण!”

📣 प्रश्न प्रशासनाला:

  1. भर पावसात रस्ता बांधण्याची कोणती तांत्रिक परवानगी दिली गेली?
  2. कामाचे गुणवत्ता नियंत्रण कुठे गेले?
  3. हा निधी आणि बिलांची चौकशी होणार की नाही?

रस्ता तयार झाला, पण नागरिकांच्या मनात विश्वासाची वाट चुकली.
आता पाहायचं प्रशासन खरंच जागं होतं की पुन्हा एकदा ढगांबरोबर ही जबाबदारीही वाहून जाते!

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!