वडूज पोलिसांची डॅशिंग कारवाई!हरवलेले तब्बल ₹4.32 लाखांचे 24 मोबाईल परत —निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचा परफॉर्मन्स सुपरहिट


सातारा : वडूज पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पुन्हा एकदा आपला कौशल्यपूर्ण तपास सिद्ध करत तब्बल ४,३२,०००/- रुपये किंमतीचे २४ हरवलेले मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत दिले आहेत.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सांवत यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

सध्या मोबाईल चोरी व गहाळ होण्याचे प्रकार वाढत असताना वडूज पोलीस ठाण्याने सीईआयआर पोर्टलचा प्रभावी वापर, तसेच महाराष्ट्र व इतर राज्यांमधील मोबाईल धारकांचा सातत्याने शोध घेत —
गुन्हेगारांचा माग काढत मोबाईल परत मिळवण्यात यश मिळवले.

या कारवाईत
पोहवा शिवाजी खाडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका पवार यांनी अतिशय मेहनत घेतली आहे.

ही मोहीम सुरूच राहणार
पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले की,

“नागरिकांची मालमत्ता शोधून मिळवणे ही आमची जबाबदारी आहे. अशा मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहेत.”



aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!