मेढ्याच्या राजकीय रणभूमीवर दोन शक्ती आमने-सामने!” एकाच दिवशी दोन भव्य कार्यक्रमांची टक्कर – राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका

सातारा

४ ऑगस्ट २०२५ हा दिवस मेढा परिसरासाठी राजकीय उलथापालथीचा ठरणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे विधान परिषदेचे आमदार व प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे यांचा भव्य सत्कार सोहळा मेढा येथे होत आहे, तर दुसरीकडे भाजपस्थित माथाडी नेते श्री. वसंतराव मानकुमरे (भाऊ) यांनी अचानक माथाडी कामगार दत्ता भालेकर यांच्या समर्थनार्थ जावलीच्या स्वाभिमानासाठी जाहीर निषेध मोर्चा आणि सभा याच दिवशी, त्याच ठिकाणी आयोजित केली आहे.


राजकीय ‘टायमिंग’ की संयोग? – खळबळजनक प्रश्न उपस्थित!

ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांचा प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीबद्दलचा हा सत्कार सोहळा आधीच नियोजित होता. त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण जावली तालुक्यात तयारीचा डंका पिटवला होता.

मात्र, त्याच दिवशी भाजपच्या वसंतराव मानकुमरे यांनी माथाडी कामगार नेते उद्योजक दत्ता पवार यांच्यावर कथित राजकीय द्वेषातून झालेल्या आरोपाविरोधात निषेध मोर्चा जाहीर करून, संपूर्ण राजकीय लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


 राजकीय नेपथ्यामागे काहीतरी घडतंय का?

“एकीकडेराष्ट्रवादी शरद पवार प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी विशेष भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गटाचा मेळा, दुसरीकडे माणकुमरे गट भाजप तालुक्यातील नेते कार्य कर्ते घेऊन  भाजपचा रेटा – मेढ्यात दोन राजकीय शक्तींची थेट जुगलबंदी!”

“हा फक्त निषेध मोर्चा नाही, तर हा संदेश आहे की, जावलीतील जनमत कोणाच्या बाजूने  राष्ट्रवादी शशिकांत शिंदे गट की तालुक्यातील मानकुंमरे गट आहे याची झलक दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे!”

“हा कार्यक्रम अनायासे नव्हे, तर नियोजनबद्ध असल्याचे बोलले जात आहे

– अशा प्रतिक्रिया राजकीय निरीक्षकांकडून उमटू लागल्या आहेत.


 ‘आ. शिंदे  VS ‘मानकुमरे’ – मेढ्यात कोणती लाट?

शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव प्रस्थापित करताना, शिंद्देना टक्कर देण्यासाठी वसंतराव मानकुमरे यांनी लोकभावनेच्या मुद्द्यावर जनमत गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पाहता, आगामी काळात जावली-सातारा कोरेगाव राजकारणात मोठी भूकंपसदृश घडामोड घडू शकते.


दोनही कार्यक्रमांची माहिती:

🟢आ. शशिकांत शिंदे यांचा सत्कार सोहळा
 ठिकाण: मेढा | 🕙 सकाळी ११ वाजता | कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

🔴 वसंतराव मानकुमरे यांचा निषेध मोर्चा व सभा
 ठिकाण: मेढा –केळघर (एस.टी. स्टँड) | 🕑 दुपारी २ वाजता | दत्ता पवार यांच्या समर्थनार्थ भव्य जमाव अपेक्षित


“मेढा बनतेय जावली राजकारणाचं युद्धभूमी!”

एका बाजूला पवारांचे नेतृत्व, दुसऱ्या बाजूला भाजपची माथाडी कामगारांवर अन्याय झाला म्हणून जनतेमधून भावनिक जोड  देण्याचा प्रयत्न – यामुळे जावलीतील सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मतदारांपर्यंत गोंधळाची आणि उहापोहाची स्थिती निर्माण झाली आहे.


 ही टायमिंग राजकारणाची खेळी की भावनिक स्वाभिमानाचा उद्रेक?’ – उत्तर येत्या ४ ऑगस्टला मिळेल!

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!