ओझरेच्या दारू अड्ड्यावर मेढा पोलिसांनींनी छापा मारला पण दारू विकणारा अड्ड्यावरून पळून गेला
मेढा:(प्रतिनिधी) मौजे ओझरे ता जावली गावचे हद्दीत प्रदीप दिनकर लकडे हा देशी दारूची चोरटी विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने मिळाल्या बातमीच्या ठिकाणी मेढा पोलिसांनी छापा टाकला पण पोलिसांना बघताच अड्ड्यावर दारू विकणारा प्रदीप दिनकर लकडे पोलिसांची चाहूल लागताच त्याच्याकडे असलेले पांढऱ्या रंगाची पिशवी त्या ठिकाणी टाकून पळून मेढा
सदर पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या मिळुन आलेला देशी-विदेशी दारूचा 2,845/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई सपोनि संतोष तासगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो फौ शिंगटे,पो. कॉ.दिपक इंगवले पो.कॅा.अभिजीत वाघमळे पो. कॉ. सुरज वाघमळे यांनी सहभाग घेतला.. सदर गुन्ह्याचा तपास सहा.पो फौ शिंगटे हे करीत आहेत..