मुंबई गोवा महामार्गावर चारचाकी काही मिनिटातच जळून खाक :गाडीत स्फोट होउन गाडी पूर्णतः आगीच्या भक्षस्थानी(व्हिडीओ)

मुंबई गोवा महामार्गावर चारचाकी काही मिनिटातच जळून खाक

गाडीत स्फोट होउन गाडी पूर्णतः आगीच्या भक्षस्थानी

मुंबई गोवा महामार्गावर उत्तर गोव्यातील कोलवाळ येथे गोव्याहून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या एका चार चाकी कारला सोमवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. ही गाडी आंध्र प्रदेश पासिंगची असल्याचं सांगितले जाते. चालत्या गाडीच्या बोनेट मधून धूर आल्यानंतर प्रवाशांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली, मात्र त्वरित गाडीने पेट घेतला. ही आग एवढी भयानक होती की गाडीचा जागीच स्फोट झाला. या गाडीमध्ये आंध्र प्रदेशातील चार पर्यटक प्रवासी प्रवास करत होते. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत गाडी पूर्णतः आगीच्या भक्षस्थानी पडली होती. गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ बंद झाली होती.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!