रिक्षा ड्रायव्हरची मुलगी आदिबा अनम अशफाक अहमद झाली IAS – यवतमाळच्या कन्येचा ऐतिहासिक यश

महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी ठरण्याच्या मार्गावर आदिबा अनम अशफाक अहमद – यवतमाळच्या कन्येचा ऐतिहासिक यश

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2024) अंतिम निकालात महाराष्ट्रातील यवतमाळच्या आदिबा अनम अशफाक अहमद हिने संपूर्ण देशातून 142वा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे ती महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी होण्याच्या मार्गावर आहे.

आदिबाचा प्रवास संघर्षमय असूनही प्रेरणादायी आहे. तिचे वडील रिक्षा चालक तर आई गृहिणी असून, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. मात्र, अपार कष्ट आणि मुलीच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत तिच्या वडिलांनी शिक्षणात कुठलीच अडचण येऊ दिली नाही.

तिचे प्राथमिक शिक्षण यवतमाळ जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत झाले आणि पुढील शिक्षणासाठी ती पुण्याकडे वळली. सुरुवातीला डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या आदिबाने, त्या स्वप्नाच्या अपूर्णतेनंतर UPSC कडे वळण्याचा निर्णय घेतला – आणि त्यातही चौथ्या प्रयत्नात यश मिळवले.

तिने हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था आणि नंतर दिल्लीतील जामीया निवासी प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतले. तिच्या सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे.

आज तिच्या या यशामुळे यवतमाळ जिल्ह्यातून ते महाराष्ट्रभर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आदिबाचे यश केवळ तिचे नाही, तर ते अनेक विद्यार्थिनींसाठी आणि अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी एक दीपस्तंभ ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात आपले नाव कोरणाऱ्या आदिबा अनमचे यश खरोखरच गौरवास्पद आणि प्रेरणादायी आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!