“महाराष्ट्राचा अभिमान — मेजर डॉ. समीर पवार यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट एनसीसी अधिकारी पुरस्कार!”

जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथील एनसीसी अधिकारी मेजर डॉक्टर समीर पवार यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय उत्कृष्ट एनसीसी अधिकारी पुरस्कार
महाराष्ट्र राज्य एनसीसी अधिकारी वेल्फेअर बोर्ड यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एनसीसी अधिकाऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे,


या मध्ये जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथील एनसीसी अधिकारी मेजर डॉक्टर समीर पवार यांनाही विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.
मेजर डॉक्टर समीर पवार हे गेली वीस वर्षे एनसीसी अधिकारी म्हणून 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन, सातारा यांच्या अंतर्गत एनसीसी अधिकारी व क्रीडा संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून वर्ष 2021 मध्ये त्यांना राष्ट्रीय स्तरावर डायरेक्टर जनरल ऑफ एनसीसी कमंडेशन कार्डने सन्मानित करण्यात आले आहे.


मेजर डॉक्टर समीर पवार यांना मिळणाऱ्या या सन्मानाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मदन दादा भोसले, उपाध्यक्ष मा शंकरराव गाढवे सर, सचिव मा डॉ जयवंतराव चौधरी सर, सहसचिव मा. प्रा. नारायणराव चौधरी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ विनोद वीर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर गण तसेच 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम ए राजमणियार (सेना मेडल), ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कर्नल आनंद, सुभेदार मेजर तानाजी भिसे साहेब, सुभेदार संभाजी शिंदे, सुभेदार दादा आरगडे, हवालदार नारायण गोळे आणि इतर स्टाफ यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!