महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील धोकादायक वळणे व धोकादायक रस्त्याचे रुंदीकरण करावे राजेंद्र राजपुरे यांचा बांधकाम विभागाला इशारा

महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील धोकादायक वळणे व धोकादायक रस्त्याचे रुंदीकरण करावे राजेंद्र राजपुरे यांचा बांधकाम विभागाला इशारा

पाचगणी –
महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने रुंदीकरण करावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे महाबळेश्वर तालुक्याचे युवा नेते यांनी केली आहे
महाबळेश्वर पाचगणी या पर्यटन स्थळी दरवर्षी लाखो पर्यटक आपल्या वाहनाने भेट देतात मात्र अरुंद रस्ते धोकादायक वळणे अशा ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे अशा ठराविक ठिकाणीच अनेक वेळा अपघात झाले आहेत शेकडो जणांना प्राण आत्तापर्यंत गमवावे लागले आहे याला नेमके जबाबदार कोण आहे दरवर्षी याच धोकादायक वळणावर अरुंद रस्त्या असल्यामुळे अपघात होत असतात मात्र बांधकाम विभाग या अपघातातून कोणताही बोध घेत नाही

महाबळेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत जि. म. बँक संचालक राजेंद्र राजपूरे यांचे बांधकाम विभागास निवेदनातून स्पष्ट इशारा दिला आहे तात्काळ या रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून भविष्यातील होणाऱ्या अपघातास बांधकाम विभागाने तात्काळ उपायोजना करून कामाला सुरुवात करावी असे राजपुरे यांनी सुचित केले आहे

. : दोनच दिवसापूर्वी याच रस्त्यावर

गुरेघर या ठिकाणी अपघातामध्ये आंब्रळच्या तरुण युवकाचा हकनाक बळी गेला आहे. याला रस्त्याची दुरवस्था जबाबदार होती. अशा घटना टाळावयाच्या असतील तर रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे असे होत असतानाच दरवर्षी या रस्त्यावर बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम विभाग आहे हे स्पष्ट होते त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ याच्यातून बोध घेऊन धोकादायक ठिकाणी असणारे रस्त्याचे रुंदीकरण व काही ठिकाणी रस्त्यावरील असणारी अतिक्रमण तात्काळ काढावीत अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील राजपुरी यांनी दिला आहे

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!