महाबळेश्वर तालुक्यात सेवा पंधरवड्याचा आज पासून शुभारंभ

महाबळेश्वर तालुक्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

महाबळेश्वर | तहसील कार्यालय महाबळेश्वर येथे आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता सेवा पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले असून, तहसीलदार सचिन मस्के यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना महसूल विभागाशी अधिक समन्वय साधता यावा, तसेच शासकीय सेवा व सुविधा गाव–वाडी–वस्त्यांपर्यंत थेट पोहोचाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून विविध महसूलविषयक कामे, दाखले, तक्रारी, तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. महसूल विभाग तळागाळापर्यंत पोहोचावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!