महाबळेश्वर तालुका : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे नवे पदाधिकारी नियुक्त

महाबळेश्वर तालुका : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे नवे पदाधिकारी नियुक्त
पुढारी वृत्तसेवा
महाबळेश्वर : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती समारंभपूर्वक करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ऋषी दादा अरुण वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात संघटनात्मक बळकटीसाठी विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
यावेळी शहर महिला अध्यक्षा सायरा ताई शेख, सरचिटणीस नुराजांहा खार खंडे तसेच पदाधिकारी मोहन कारंडे आणि आदित्य चव्हाण उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शेअर महिला कार्याध्यक्ष म्हणून फिरोजा मुस्तकीन महापुळे, शेअर संघटक म्हणून मोहम्मद वारुणकर आणि शहर सरचिटणीस म्हणून राकेश कदम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष ऋषी दादा अरुण वायदंडे म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शुकुमार कांबळे आणि राज्य अध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष महाराष्ट्रभर संघटनवाढ आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी सातत्याने कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन पक्ष शोषित, पीडित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढा देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेत गावागावात पक्षाची संघटना मजबूत करावी, लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून कार्य करावे आणि महाबळेश्वर तालुक्यात पक्षाचा विस्तार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कामगार जिल्हाध्यक्ष म्हणून पुढील वाटचालीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नव्या जबाबदाऱ्यांचे स्वागत करत संघटनवाढ, सामाजिक न्याय आणि कामगारांच्या प्रश्नांवर प्रभावी काम करण्य

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!