महाबळेश्वरच्या बेलमाऊंट सोसायटीत गुन्हा दाखल
पांचगणी सादिक सय्यद : नगरपालीकेच्या हद्दीतील सिसन २०२ /ब या बेलमाउन्ट सोसायटीतील प्लॅाट क्रमाक ११ मध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आली होती . याबाबत महाबळेश्वर नगरपालीकेचे वृक्षअधिकारी यानी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . मिळालेल्या माहीतीनुसार . नगरपरिषदेमध्ये वृक्ष अधिकारी म्हणुन काम करित आहे. महाबळेश्वर नगरपरिषदेच्या हद्दीतील वनेत्तर ( नाँनफॉरेस्ट)जमिनीमध्ये होणारे वृक्षतोडीबाबत पाहणी करुन वृक्षतोड होवु नये याबाबत दक्षता घेणे, अनाधिकृत वृक्षतोड आढळुन आल्यास त्याबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद महाबळेश्वर यांना अहवाल सादर करणे व वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करीत असतो. मी दिनांक 25/7/2023 रोजी नियोजीत ड्युटीवर काम करीत असताना माझे विभागाचे कर्मचारी नासीर बाबालाल वलगे यांनी मला समक्ष माहीती दिली कि बेलमाउँट को ऑप .सोसायटी सि.स.नं 202/ब/11 या प्लाँटमध्ये वृक्षतोड झाली आहे ते आपन पाहुन खात्री करावी. सदरची माहीती मीळताच मी समक्ष जागेवर जावुन पाहणी केली असता ताजी वृक्षतोड झाली असल्याचे माझ्या निदर्शनास आले व त्या बाबतची माहीती मी आमचे नगरपरीषदेचे मुख्याधीकारी यांना दिली असता त्यांनी झाले प्रकाराबाबत पंचनामा करणेबाबतच्या सुचना दिल्या. त्यानुसार भुमीअभीलेख विभाग आणी वनविभाग यांना पत्र देवुन तात्काळ प्रतीनीधी पाठविणेस कळविले व दुपारी 2 ते 4 यावेळेत पंचनामा पुर्ण केला आहे .सि.स.नं 202/ब च्या प्लाँट क्रमांक 11 क्षेत्र 0.16 हे.आर मध्येविल्सनपाँईट रोडपासुन 10 मीटर व सोसायटीच्या अंर्तगत रस्त्यापासुन 6 मीटर अंतरावर पत्रा शेडच्यामागे 8 मी. लांबीव 8 मी. रुंदी एवढ्या जमीनीवरील झाडे व झाडांच्या फांद्या तोडुन साफसफाई केलेचे आढळुन आले त्यामध्ये 3 जांभुळ झाडे बुंद्यापासुन तोडले असुन इतर 5 जांभुळ झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत त्याची मोजमापे घेतली तसेच मीळकतीच्या चतुरसीमा तपासुन पाहील्या व तेथील अक्षांश रेखाअंशाची नोंद घेतली आणी वृक्षतोडीचे जिवो टँग फोटो मोबाईल कॅमेरामध्ये घेतले सदरचा पंचनामा करतेवेळी श्री सहदेव विनायक भिसे वनपाल महाबळेश्वर, अभीनंदन भानुदास सावंत, वनरक्षक महाबळेश्वर, श्रीमती गायकवाड मँडम भुमी अभीलेख कार्यालय महाबळेश्वर आणी नासीर बाबालाल वलगे व इतर नगरपरीषद कर्मचारी माझ्यासोबत होते . सदर मीळकतेचे मालक अभीजीत रामचंद्र शिंदे व सिमा रामचंद्र शिंदे यांनी मिळकत विकसीत करण्यासाठी अडथळा येणारी वरील प्रमाणे जांभुळ जातीच्या 8 झाडांची विना परवाना तोड मजुरांकरवी करुन घेवुन त्याच्या लाकुड मालाची परस्पर विलेवाट लावली आहे . तसेच वृक्षगणना रेकाँर्ड नुसार वेळोवेळी 20 झाडांची तुट झालेचे दिसुन आले . झाले प्रकाराबाबत मुख्याधीकारी महाबळेश्वर यांचेकडे अहवाल सादर केला असता त्यांनी सबंधीता विरुद्ध गुन्हा दाखल करणेबाबतचे आदेश व अधीकार पत्र मला दिले आहे. मिळकत धारक यांनी आपसामध्ये संगणमत करुन मिळकत विकसित करण्यासाठी अडथळा होत असलेमुळे विनापरवाना व बेकायदेशीरपणे वृक्षतोड करुन व त्याचे लाकुडमालाची परस्पर विल्हेवाट लावुन वृक्षांचे सुमारे 20,000/- रु. चे नुकसान केले आहे म्हणुन त्यांचेविरुध्द महाराष्ट्र (नागरी क्षेत्र)झाडांचे जतन व संवर्धन अधिनियम 1975 चे कलम 21 (1) (2), 11/1 भादवी कलम 427,34 प्रमाणे सरकारतर्फे माझी कायदेशीर फिर्याद हिरवे यांनी दाखल केली आहे .