मलकापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचे तीन तेरा – मळमूत्राचे सांडपाणी रस्त्यावर, नागरिक त्रस्त!
सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक कर गोळा करणारी म्हणून ओळख असलेल्या मलकापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपंचायतीचे कर्मचारी नियमितपणे कचरा गोळा करणे, ड्रेनेज साफ करणे अशी कामे करतात. तरीदेखील कोल्हापूर नाका परिसरात सध्या मळमूत्राचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, महिला, अबालवृद्ध नागरिकांची वर्दळ असते. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, या गंभीर समस्येकडे ना माजी नगरसेवकांनी लक्ष दिले आहे, ना नगरपंचायतीने ठोस पावले उचलली आहेत.

यामुळे नागरिक आता थेट प्रश्न विचारत आहेत –
👉 मलकापूर नगरपंचायत या समस्येकडे खरंच लक्ष घालणार आहे का? की स्थानिकांच्या आरोग्याशी असा खेळच सुरू राहणार?
नागरिकांच्या तीव्र नाराजीच्या पार्श्वभूमीवर आता नगरपंचायतीकडून काय प्रतिक्रिया मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
✍️ हेमंत पाटील, Aim Media साठी सातारा-कराड



