
मेढा :
मेढा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री. विकासजी देशपांडे यांनी उपनगराध्यक्ष पदाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली. यावेळी त्यांना उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत बसवण्याचा मान महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी जावली तालुक्यातील विविध मान्यवर नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री अमितदादा कदम, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ बाबा शिंदे, उपसभापती गोरखजी महाडिक, मेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रुपालीताई वारागडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठलजी देशपांडे, बांधकाम सभापती शिवाजीराव देशमुख, आरोग्य सभापती नितीनजी मगरे, महिला व बालकल्याण सभापती आनंदीताई करंजेकर यांच्यासह नगरसेवक शिवाजीराव गोरे, हरिश्चंद्र तीवाटणे, सुशांत कांबळे, धनंजय पवार उपस्थित होते.

तसेच नगरसेविका तेजस्विनी इगावे, अनघा करंजेकर, सुनिता तांबे, पुष्पा मुकणे, युवा नेते संतोषजी वारागडे, भाजप मंडळाध्यक्ष मारुती चिकणे, भाजप मंडळाध्यक्ष संदीपजी परामने, भाजप शहराध्यक्ष संजय सपकाळ, माजी नगराध्यक्ष पांडुरंग बापू जवळ आणि मुख्याधिकारी अजिंक्य पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. विकासजी देशपांडे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत मेढा शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.



