भर पावसात वाहतूक सुरळीत करणारे हिरो: नागठाणे पोलिसांची कर्तव्यदक्षता वाखाणण्याजोगी”

भर पावसात वाहतूक सुरळीत करणारे नागठाणे पोलिस ठाणे; नागरिकांनी केला कौतुकाचा वर्षाव

नागठाणे, ता. २४: पुणे-बंगळूर महामार्गावरील नागठाणे ते अतीत-शेंद्रे परिसरात गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे शेकडो वाहन चालक तासन्‌तास अडकून पडले होते. मात्र, या गंभीर परिस्थितीत नागठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. धोंडीराम वाळवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षरशः जिकिरीने प्रयत्न करत वाहतूक सुरळीत केली.

काल रात्री १ ते सकाळी ४.३० वाजेपर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅफिक क्लिअर करण्यात आली. आज सकाळीही त्यांनी आणि त्यांच्या स्टाफने अवघ्या एका तासात शेंद्रे कारखाना ते वळसेपर्यंत अडकलेली वाहने मार्गस्थ केली.

पावसामुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा, अपूर्ण रस्ते कामे आणि घसरलेल्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम गंभीर बनला होता. अशा वेळी कमी मनुष्यबळ असतानाही पोलिसांनी अथक परिश्रम घेत सर्व अडकलेली वाहने मार्गस्थ केली. यामध्ये पोलीस नाईक विशाल जाधव, चालक पवार, अशोक माने, उत्तम गायकवाड, पोलीस हवालदार कणसे, चालक कदम आणि पीएसआय भोसले यांचा मोलाचा वाटा होता.

संध्याकाळच्या सत्रातही मुसळधार पावसात स्वतः रस्त्यावर उतरून सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर यांनी पुन्हा एकदा ट्रॅफिक सुरळीत केली. त्यांच्या अनुभवसंपन्न नियोजन आणि तत्परतेमुळे हजारो वाहनांनी आपला प्रवास सुरळीतपणे पूर्ण केला.

या कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले असून, ‘खऱ्या अर्थाने हे पोलिसांचे कार्य वाखाणण्याजोगे आणि प्रेरणादायी आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!