
“ब्रेकिंगची राणी – साताऱ्याच्या क्राईम वर्ल्डमधील निर्भय आवाज, गौरी आवळे!”
(वाढदिवसानिमित्त खास लेख)
“पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचं माध्यम नसून ती समाजपरिवर्तनाची सुरुवात असते,” हे शब्द साकार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गौरी आवळे!
सातारा जिल्ह्यातील पहिली महिला क्राईम रिपोर्टर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गौरी मॅडम आज त्यांच्या हटके अंदाजात, डॅशिंग आणि जबरदस्त आत्मविश्वासाने पत्रकारितेत आपली खास जागा निर्माण करून आहेत.
खटाव तालुक्यातील दरूज गावची सुकन्या, तरुण भारत प्रतिनिधी, वीरांगणा प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष, आणि आजच्या घडीला हजारो महिलांची आवाज बनलेली – गौरी आवळे.

क्राईम रिपोर्टिंगची निर्भीड स्टाईल – ‘गौरी ब्रँड’
साताऱ्यात कुठलाही गंभीर गुन्हा झाला की पोलिसांबरोबरच एक नाव लगेच चर्चेत येतं – गौरी आवळे.
“ब्रेकिंगची राणी” हे बिरूद मिळवलेली गौरी मॅडम फर्स्ट इन्फॉर्मेशन मिळवण्यात पटाईत, आणि बातमी सादर करण्यात आपल्या खास शैलीने चर्चेत असतात. त्यांच्या बातम्यांमध्ये तथ्य, धार आणि संवेदना यांचा अनोखा संगम असतो. विशेष म्हणजे, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्या नेहमी पहिल्या फळीत असतात.

शिवभक्ती आणि सामाजिक भान यांचा संगम
गौरी मॅडम मनस्वी शिवभक्त, आणि विचारांनी शाहू-फुले-आंबेडकरांच्या तत्वांवर चालणाऱ्या. त्यांनी पत्रकारितेला सामाजिक न्यायाचे स्वरूप दिले आहे.
वीरांगणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक पीडित महिलांना न्याय मिळवून दिला. अत्याचारग्रस्त महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडत, त्या महिला वर्गासाठी खंबीर भिंतीसारख्या उभ्या राहिल्या आहेत.

निसर्गप्रेम आणि जीवनशैली
निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची आवड असलेल्या गौरी आवळे यांचं जीवन साधं पण स्फूर्तिदायक आहे. बाहेरून जितक्या स्ट्रॉंग दिसतात, तितक्याच आतून त्या भावनिक आणि संवेदनशीलही आहेत. त्यांची पत्रकारिता केवळ ‘न्यूज’पुरती मर्यादित नाही, ती चळवळीची सुरुवात असते.

साताऱ्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचलेला आवाज
महिला, युवती, पोलीस विभाग, सामाजिक प्रश्न, गुन्हेगारी – या सगळ्या क्षेत्रात त्यांचं पॉवरफुल नेटवर्क आहे.
त्यांच्याकडे असलेली माहिती, त्यांचा अचूक अंदाज, आणि तेजस्वी रिपोर्टिंग यामुळे तरुण भारत परिवारात त्यांना विशेष स्थान आहे.

वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा
आज या प्रेरणादायी, तितक्याच आक्रमक आणि संवेदनशील पत्रकार गौरी आवळे यांचा वाढदिवस!
समाजातील शोषितांसाठी आवाज बनणाऱ्या, लेखणीने क्रांती करणाऱ्या आणि महिलांच्या हक्कासाठी सतत मैदानात असणाऱ्या गौरी मॅडम यांना शतशः शुभेच्छा!
आपण जे काम करत आहात, ते प्रेरणा देणारं आहे. तुमच्या लेखणीतून आणखी अनेक अन्यायाविरुद्धची लढाई लढली जावी हीच प्रार्थना!
– विशेष प्रतिनिधी ,इम्तियाज मुजावर “तरुण भारत”
(सातारा जिल्हा)