फुलेनगर, कुडाळ येथे नवीन डीपी आणि एल.टी. लाईनसाठी तातडीने कार्यवाही; ग्रामस्थांच्या मागणीनंतर बाबाराजेंची जलद हालचाल


फुलेनगर, कुडाळ येथे नवीन डीपी आणि एल.टी. लाईनसाठी तातडीने कार्यवाही; ग्रामस्थांच्या मागणीनंतर बाबाराजेंची जलद हालचाल

मौजे कुडाळ (ता. जावली, जि. सातारा) येथील फुलेनगर परिसरातील नागरिकांनी आज महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.
ग्रामस्थांनी फुलेनगर पाटी ते प्रसाद कदम व महेश घोडके यांच्या घरापर्यंत नवीन डीपी व वाढीव पोल बसवून एल.टी. लाईन टाकण्याची मागणी केली.

ग्रामस्थांचे म्हणणे होते की, या भागात वीज पुरवठा अपुरा आहे आणि वाढत्या वसाहतीमुळे नवीन यंत्रणेची निकड भासते आहे.
यावर तातडीने प्रतिसाद देताना, बाबाराजेंनी संबंधित अधिकाऱ्यांना येत्या जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून या कामाचा समावेश करून काम मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.

याशिवाय, त्यांनी महावितरण (MSEB) विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित Estimate (मागणी पत्रक) तयार करण्याचे आदेशही दिले आहेत.
त्यामुळे लवकरच फुलेनगर परिसरात वीज वितरणाचा दर्जा उंचावला जाणार आहे.

या निर्णयामुळे फुलेनगरसह आजूबाजूच्या ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण असून, सर्व ग्रामस्थांनी बाबाराजेंचे आणि प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

यामुळे फक्त वीज समस्या सुटणार नाही, तर भविष्यातील ग्रामविकासाला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

राजकीय आखाडा

दहा कोटींचा नफा देणाऱ्या चेअरमनवरच अविश्वास? – वसंतराव मानकुमरे यांचा थेट इशारा!” 🛑जावळी बँकेतून ‘भोसले-गवळी’ संचालकांवर सडकून टीका; सहकार परिषदेतून ‘सरळ करण्याचा’ घणाघात!(व्हिडीओ)

error: Content is protected !!