प्रतापगड साखर कारखान्याचा रोलर पूजनाचा 3 ऑगस्टला सोहळा


शेतकरी-कामगारांच्या एकतेतून नवसंजीवनी – अध्यक्ष सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाचा ठसा

सातारा | प्रतिनिधी

प्रतापगड सहकारी साखर कारखान्यातील रोलर पूजनाचा सोहळा हा केवळ एक परंपरागत कार्यक्रम नव्हे, तर शेतकरी-कामगारांच्या आशा-अपेक्षांचा नवा टप्पा ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रविवारी (दि. ०३ ऑगस्ट २०२५) सकाळी १०:३० वा. मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात कारखान्याचे अध्यक्ष सौरभ राजेंद्र शिंदे यांनी कारखान्याच्या यशस्वी सहकार पर्वाची घोषणा करताना शेतकरी, कामगार व सभासदांचा आत्मविश्वास दृढ केला. गेल्या काही वर्षांत आलेल्या आव्हानांवर मात करून कारखान्याला नवसंजीवनी देण्यात शिंदे यांच्या नेतृत्वाची ठसा उमटल्याचे उपस्थितांमध्ये ठळकपणे जाणवले.

“कारखाना म्हणजे फक्त उत्पादन केंद्र नव्हे, तर हजारो शेतकरी-कामगारांचे आयुष्य आहे. त्यांच्या हक्कासाठी व प्रगतीसाठी आपण लढत राहणार, सलग चौथा हंगाम यशस्वी करून दाखवण्यासाठी चेअरमन सौरभ शिंदे” यशस्वी ठरत आहेत आगामी काळात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना स्वबळावर चालवण्यासाठी सभासदांचे पाठबळ व शेतकऱ्यांचे सहकार्य असेच लाभले तर कारखाना स्वबळावर चालेल असे ठाम आश्वासन अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी दिले.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सभासद, उस उत्पादक शेतकरी, कामगार व अधिकारी उपस्थित होते. कारखान्याच्या पुनरुज्जीवनाच्या प्रवासात शेतकरी-कामगारांना विश्वास देणारे नेतृत्व म्हणून सौरभ शिंदे यांची प्रतिमा अधिकच बळकट होत आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!