
प्रतापगड सहकारी साखर कारखाना लि., सोनगांव-करंदोशी च्या सर्व ऊस उत्पादक सभासदांना तसेच बिगर सभासदांना सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, सन २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा करणा-या सभासदांची ऊस बिलातून कोणत्याही प्रकारची शेअर्स (भागाची) रक्कम कपात करुन घेतली जाणार नाही. काही अपप्रवृत्तींना प्रतापगड सह. साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असलेला बघवत नाही. अशी विघ्नसंतोषी लोकं अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. वास्तविक प्रतापगड कारखान्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे आर्थिक चक्र गतिमान झालेले आहे व तालुक्यातील युवकांना रोजगार निर्मिती झालेली आहे. आपल्या तालुक्यातील विकासात्मक वाटचाल चालु ठेवण्यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता आपला असणारा संपूर्ण ऊस अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योगाला पाठवावा, हि विनंती.