पुणे सातारा महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत भरधाव वेगाने स्कोडा कार उभ्या 407 टेम्पोला धडकली चालकासह कार मधील महिला गंभीर जखमी(व्हिडीओ)

सातारा ब्रेकिंग

पुणे सातारा महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत भरदा वेगाने स्कोडा कार उभ्या असणाऱ्या 407 टेम्पोला धडकली चालकासह कार मधील महिला गंभीर जखमी

पुणे सातारा महामार्गावरील वेळे गावच्या हद्दीमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कोडा कारचा उभ्या असणाऱ्या 407 च्या टेम्पोला धडक स्कोडा कार मधील चालक आणि गाडीच्या शेजारी असणारी महिला गंभीर स्वरूपात जखमी झाली असल्याची माहिती समोर येत आहे

पुण्यावरून सातारच्या दिशेने स्कोडा जात होती 11 वाजल्याच्या सुमारास एम एच 50 क्यू 57 58 ही स्कोडा रस्त्याच्या लगत उभ्या असणाऱ्या 407 गाडीला येऊन भरधाव वेगाने धडकली सदर 407 गाडी ही हायवेवर कलर पट्टे मारण्याचे काम करत होते यामध्ये दोन कामगार देखील जखमी झाले आहेत मात्र स्कोडा कार मधील असणारा चालक आणि लगत बसणारी एक महिला गंभीर स्वरूपात जखमी झाली आहे याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!