पुणे महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळली ;वाहतूक बंद

वरंधा घाटात दरड कोसळण्याचा धोका असल्याने पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे आणि रायगड प्रशासनाने यासंदर्भात आदेश काढले आहेत.

राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. भोरवरून महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. अनेक वळणे आहेत. त्याऐवजी ताम्हिनी घाट सुरक्षित आहे. यामुळे हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना वरंधा घाट बंद केला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत हा रस्ता बंद असेल.

या ठिकाणांवरुन वाहनधारक जाऊ नये, यासाठी प्रशासनाने मातीचे ढिगारे लावून रस्ता बंद केला आहे. परंतु असे अडथळे पार करत धोकादायक पद्धतीने या मार्गावरुन वाहनधारक प्रवास करत आहेत.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!