
जावळी तालुक्यातील सायघर येथील कुमार संस्कार धनावडे ने इंजीनियरिंग मध्ये मिळवले 99.91%

पाचगणी (प्रतिनिधी) जावळी तालुक्यातील सायघर येथील कुमार संस्कार धनावडे याने नुकत्याच झालेल्या MHT CET Engg मधे ९९.९१% पर्सेंटाइल मिळवून यश संपादन केले आहे कुमार संस्कार धनवडे हा जावळी तालुक्यातील सायगरिया दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थी असून सध्या तो पुण्यात शिक्षण घेत आहे चिरंजीव कुमार ला मिळालेले हे यश तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे दुर्गम डोंगराळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशाच पातळीवरून स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग भरारी घेऊन आपली उज्वल भविष्य कष्ट जिद्द आणि चिकाटीवर घडवावे अशा प्रतिक्रिया देखील कुमार संस्कार धनवडे यांनी दिले आहेत आगामी काळात जावळी तालुक्याचे नाव साता समुद्रा पार आपण पोहोचवणार असल्याच्या प्रतिक्रिया देखील त्याने दिले आहेत

कुमार धनावडे यांच्या या यशावर जावळी तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून पुण्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव . त्याचे सर्व नातेवाईक, सर्व क्षेत्रातील मान्यवर यांचेकडून कौतुक होत आहे. संस्कार चे मुळ गांव सायघर हे असून तो सध्या पिंपरी चिंचवड येथे शिक्षण घेत आहे. संस्कार चे वडील अंकुश मारुती धनावडे चुलते प्रकाश मारुती धनावडे , मुंबई मंत्रालय सचिव आर. के . धनावडे , लक्ष्मण शेठ धनावडे, अशोक जी गोळे . ग्रामस्थ मंडळ सायघर(मुंबई) तसेच पिंपरी चिंचवड चे नगरसेवक , आमदार ,सकाळ पेपर्स, पुढारी पेपर यांनीही संस्कार चे अभिनंदन , कौतुक केले आहे आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्या दिल्या आहेत.