पाचगणीचे उद्योजक संतोष शेडगे यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला!

(पाचगणी प्रतिनिधी) ….उद्योजक संतोष शेडगे यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला!

पाचगणी तालुक्यातील उद्योजक संतोष शेडगे यांच्या अपहरण प्रकरणाला अवघे १५ ते 20 दिवस उलटलेले असतानाच काल रात्री वाई तालुक्यातील पश्चिम भागातील चिखली गावच्या त्यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाई तालुक्यातील चिखली गावाच्या हद्दीत अज्ञात इसमांनी संतोष शेडगे यांच्या गाडीवर हल्ला चढवला. यामध्ये वाहनाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली. मात्र शेडगे यांचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.यापूर्वी देखील त्यांना बंदूक चा धाक दाखवून भोसे गावातील मिठाई इस्टेट या परिसरातून अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली होती याबाबत देखील तक्रार पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल आहे

वाई पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष शेडगे यांच्या अपहरणप्रकरणी आधीच तालुक्यात मोठी खळबळ माजली होती. दोन आरोपी गजाआड असले तरी मुख्य सूत्रधार भरत घरत अद्याप फरार आहे. त्यात आता झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांच्या तपास क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर शंका उपस्थित होत असून मुख्य सूत्रधारासह हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!