“पाचगणीकरांचा अभिमान – लक्ष्मी कराडकर यांची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर

आदर्श नेतृत्वाचं प्रतीक – पाचगणीकरांच्या हृदयातील लक्ष्मीताई कराडकर

पाचगणी, दि. ८ ऑक्टोबर :इम्तियाज मुजावर

पाचगणी नगरपालिकेला देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर मानाचा ठसा उमटवून देणाऱ्या माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कराडकर यांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यासपीठावर स्पीकर म्हणून निवड झाली आहे. हे यश केवळ पाचगणीपुरते मर्यादित नसून संपूर्ण सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रासाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी, कचरा मुक्त पाचगणी ही स्वप्ने सत्यात उतरवून शहराला पुरस्कार मिळवून देणाऱ्या कराडकर यांच्या कार्याची आज जागतिक व्यासपीठावर दखल घेतली गेली आहे.

गेल्या सात वर्षांपासून नगराध्यक्ष नसल्यामुळे पाचगणीच्या जनतेने शहराची अवस्था डोळ्यादेखत अनुभवली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक नसताना प्रशासन चालते तेव्हा शहराचा काय हाळकल्लोळ होतो, हे पाचगणीकरांनी स्वतःच्या अंगावर भोगले. एकेकाळी स्वच्छतेसाठी आणि विकासासाठी आदर्श मानली जाणारी पाचगणी आज बकाल झाली आहे. आणि यामुळेच पाचगणीकरांच्या मनात एकच ठसा उमटला आहे—“आमच्या लक्ष्मीताई नगराध्यक्ष होत्या, तेव्हा शहराचा विकास बोलत होता, आज मात्र कचराच बोलतो.”

लक्ष्मी कराडकर यांचा कार्यकाळ हा केवळ कचरामुक्त पाचगणी घडविणारा नव्हता, तर प्रत्येक प्रभागात विकासाची नवी दृष्टी देणारा होता. रस्त्यांची सुधारणा, स्वच्छता मोहिम, पर्यटनस्थळ म्हणून पाचगणीचा सन्मान राखणे, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणणे—हे त्यांच्या नेतृत्वाचं खरे वैशिष्ट्य.

आज परिस्थिती वेगळी आहे. नगराध्यक्ष नसल्याने आणि सत्तेच्या अभावामुळे शहराचे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. या सर्व परिस्थितीत पाचगणीकर पुन्हा एकदा ठामपणे म्हणू लागले आहेत—“पाचगणीचा विकास हवा असेल, तर लक्ष्मीताई कराडकर हाच सक्षम पर्याय आहे.”

लक्ष्मी कराडकर या केवळ शांत व संयमी नेत्या नाहीत, तर वेळप्रसंगी ‘कडकलक्ष्मी’ होऊन संकटांना सामोरे जाणाऱ्या नेतृत्वाचा आदर्श आहेत. पाचगणीच्या शहरावर जेव्हा संकटे आली, तेव्हा संकटमोचक म्हणून नागरिकांनी त्यांच्याकडेच पाहिले. त्यांच्या नेतृत्वात मिळालेल्या पुरस्कारांनी आणि अभिमानाने शहराची प्रतिष्ठा उंचावली आहे.

आज दिल्लीसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पीकर म्हणून त्यांना निवड मिळाली आहे, हे त्यांच्या यापूर्वीच्या कामाची खरी पोचपावती आहे. एक महिला नेत्या म्हणून त्यांनी पाचगणीच्या सीमा ओलांडून थेट जागतिक पातळीवर आवाज पोहोचवला आहे. त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याला हा सन्मानाचा क्षण ठरला आहे.

नगराध्यक्ष पद आरक्षणामुळे मिळेल की नाही, हा मुद्दा वेगळा आहे. मात्र पाचगणीकरांच्या मते, सत्ता संपूर्ण लक्ष्मीताईंच्या नेतृत्वाखाली असली, तर कोणताही नगराध्यक्ष त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दर्जेदार काम करू शकेल. आणि अशा नेतृत्वाखाली पाचगणी पुन्हा एकदा पूर्वीसारखी स्वच्छ, सुंदर, झगमगती आणि विकासाच्या मार्गावर झेप घेईल.

पाचगणीकरांनी आता ठरवले आहे—भविष्यात शहराचे नेतृत्व पुन्हा एकदा लक्ष्मी कराडकर यांच्याकडे सोपवायचे. कारण त्यांनीच हे शहर केवळ कचरामुक्त केले नाही, तर लोकांच्या मनातील विश्वासही जिंकला आहे.

आज पाचगणीकरांच्या तोंडी एकच वाक्य आहे—
“स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी, विकासाची पाचगणी, आनंदी पाचगणी – हे स्वप्न पुन्हा फक्त आमच्या लक्ष्मीताई कराडकर यांच्या नेतृत्वाखालीच साकार होऊ शकते.”

त्यामुळेच दिल्लीतील व्यासपीठावर स्पीकर म्हणून झालेली त्यांची निवड ही फक्त सन्मानाची बाब नाही, तर पाचगणीकरांना पुन्हा उज्ज्वल भवितव्याच्या आश्वासनाचा संदेश आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!