पर्यटननगरी पाचगणी हादरली! मुंबईहून ड्रग्सचा थेट शिरकाव — ५ लाखांचे कोकेन, ४२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त; १० आरोपी अटकेत**

**पर्यटननगरी पाचगणी हादरली!

मुंबईहून ड्रग्सचा थेट शिरकाव — ५ लाखांचे कोकेन, ४२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त; १० आरोपी अटकेत**

पाचगणी :
शांत, निसर्गरम्य आणि जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीमध्ये ड्रग्स रॅकेटचा काळा चेहरा उघड झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि पाचगणी पोलीस ठाण्याने मध्यरात्री केलेल्या थरारक संयुक्त कारवाईत मुंबईतील १० आरोपींना अटक करत ५ लाख रुपयांचे कोकेन सदृष्य अंमली पदार्थ आणि तब्बल ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पर्यटन स्थळांनाही ड्रग्स माफियांनी टार्गेट केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेला धार देण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी कडक आदेश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना घाटजाई मंदिर परिसरात कोकेन विक्रीसाठी आलेल्या संशयितांविषयी अचूक आणि खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासोबत संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले.

मध्यरात्री ००.०५ वाजता पाचगणी येथील विस्टा ग्रॅन्ड सोसायटी, इस्टेला १ ए बंगला परिसरात सापळा रचण्यात आला. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कोडा रॅपीड (MH-02-DN-0259) आणि एम.जी. हेक्टर (MH-01-DK-8802) या आलिशान वाहनांमधून १० संशयित ताब्यात घेण्यात आले.

अंगझडतीदरम्यान आरोपींकडून कोकेन सदृष्य अंमली पदार्थ, मोबाईल फोन आणि चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. चौकशीत हा ड्रग्सचा साठा पाचगणी शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :

  1. महंमद नावेद सलिम परमार (वय ३२), रा. भेंडी बाजार, मुंबई
  2. सोहेल हशद खान (वय ३५), रा. पी.बी. मार्ग, मुंबई
  3. महंमद ओएस रिजवान अन्सारी (वय ३२), रा. नागपाडा, मुंबई
  4. वासिल हमीद खान (वय ३१), रा. नागपाडा, मुंबई
  5. महंमद साहिल अन्सारी (वय ३०), रा. मुंबई सेंट्रल
  6. जिशान इरफान शेख (वय ३१), रा. भायखळा, मुंबई
  7. सैफ अली कुरेशी (वय ३१), रा. मज्जीद गल्ली, मुंबई
  8. महंमद उबेद सिध्दीकी (वय २७), रा. भेंडी बाजार, मुंबई
  9. अली अजगर सादिक राजकोटवाला (वय ३०), रा. नागपाडा, मुंबई
  10. राहिद मुख्तार शेख (वय ३१), रा. ग्रँट रोड, मुंबई

या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०५/२०२५ अन्वये एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २१ (घ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर करत आहेत.

विशेष म्हणजे, जावळी तालुक्यातील ११५ कोटींच्या एमडी ड्रग्स कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई झाल्याने ड्रग्स माफियांचे जाळे सातारा जिल्ह्यात सक्रिय असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

पर्यटननगरी पाचगणीला ड्रग्समुक्त ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आक्रमक झाले असून, “ड्रग्स विक्रेत्यांना जिल्ह्यात अजिबात थारा दिला जाणार नाही” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!