पद्मभूषण महाबली पैलवान सतपाल व पैलवान साहेबराव पवार (भाऊ) यांची सदिच्छा भेट::
वयाच्या 99 व्या वर्षी कुस्ती क्रीडा क्षेत्राची सेवा करत असलेले ज्येष्ठ क्रीडा महर्षी तालीम संघाचे अध्यक्ष माननीय साहेबराव पवार (भाऊ) यांची विशेष भेट घेण्यासाठी महाबली पैलवान सतपाल आलेले, त्यांचे स्वागत करताना साहेबराव पवार (भाऊ) यांनी सांगितले की देशामध्ये मोठा गौरव प्राप्त असलेले, महाबली सतपाल यांनी कुस्तीचा आणि कुस्ती क्षेत्राचा एक दर्जा ठेवलेला आहे, आज पर्यंत देशाला फार मोठे पैलवान दिलेले आहेत आणि त्यांची कीर्ती यश असंच आबादीत राहो अशे शुभ आशीर्वाद साहेबराव पवार यांनी दिले. तालीम संघाला भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोणत्याही गोष्टी व त्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही सतपाल पैलवान यांनी दिले.
साताऱ्यामध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती संकुल यासाठी निश्चितपणे मी माझी वर्षातले काही महिने देण्यास तयार आहे असे महाबली सतपाल यांनी सांगितले .
सदर प्रसंगी साहेबराव पवार (भाऊ) यांनी त्यांचे स्वागत केले या कार्यक्रमास उपस्थित असलेले अमर जाधव, संदीप साळुंखे, जीवन कापले, माणिक पवार, उप महाराष्ट्र केसरी आबा सुळ, चंद्रकांत सुळ, वैभव फडतरे, दीपक पवार, बलभीम शिंगरे, यश पवार, प्रा रुस्तुम तांबोळी, देशमुख सर मदन पवार व राजेश्वर पवार उपस्थित होते