धक्कादायक ;तासवडे टोल नाक्याजवळ आज पहाटे ट्रॅव्हल्स आगीत जळून खाक( व्हिडिओ)

महामार्गावर तासवडे ता. कराड येथील टोलनाख्या नजीक ट्रॅव्हल्स ने अचानक पेट घेतल्याने ट्रॅव्हल जळून खाक झाली आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ट्रॅव्हलचा टायर फुटल्याने ट्रॅव्हल्स ने पेट घेतल्याची चर्चा घटनास्थळी होती. दरम्यान ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, घटनेची माहिती मिळतात तळबीढ पोलिसांनी धाव घेऊन अग्निशामक दलाला पाचरण केले. त्यानंतर कराड येथील अग्निशामक दलाच्या बंबाने पेटलेली ट्रॅव्हल्स विझवण्यात आले आहे.

आगीत ट्रॅव्हल्सचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सदर घटनेबाबत अधिकची तपशील समजू शकली नाही.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!