
इम्तियाज मुजावर
🌟 दृढ इच्छाशक्तीची प्रेरणा – श्री. चंद्रकांतजी गावडे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟
आज ज्या व्यक्तिमत्वाचा गौरव करत आहोत, त्या जावळी बँकेचे सन्माननीय चेअरमन, शांत, संयमी, आदर्श व्यक्तिमत्त्व आणि मार्गदर्शक श्री. चंद्रकांतजी गावडे साहेब यांचा आज वाढदिवस!
टोणपेवाडीसारख्या जावळी तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातून उगम पावलेली त्यांची यशोगाथा ही संघर्ष, कष्ट, आणि समर्पणाची शिकवण देणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या गावडे साहेबांनी नुसतीच व्यवसायाची भरारी घेतली नाही, तर सहकाराच्या माध्यमातून कष्टकरी, शेतकरी, माथाडी कामगार यांच्यासाठी आशेचा किरण ठरले.
बँकेच्या आर्थिक उन्नतीत त्यांचे योगदान अमूल्य आहे. संचालकापासून चेअरमन पदापर्यंत त्यांनी जावळी बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला. समाजकारणाला प्राधान्य देत त्यांनी राजकारणापेक्षा सहकाराच्या माध्यमातून सेवा करण्याचा मार्ग स्वीकारला.
मुंबई, गुजरात, राजस्थान, राजकोट ते अगदी परदेशातही आपल्या व्यवसायाचे साम्राज्य विस्तारणाऱ्या चंद्रकांतजी गावडे हे ग्रामीण भूमीतून आलेला यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांचा शांत आणि समतोल स्वभाव, दूरदृष्टी, आणि नेतृत्वगुणांनी अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे.
दत्तात्रय कळंबे महाराज आणि भिलारे गुरुजी यांच्या विचारधारेवर चालत आजही ते बँकेच्या वाढीसाठी, ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहेत. सभासदवर्ग आणि सहकारी बांधव आजही त्यांच्या कार्याची स्तुती करताना थकत नाहीत.
या विशेष दिवशी,
श्री. चंद्रकांतजी गावडे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अजून मोठं यश देवो, हीच प्रार्थना!
इम्तियाज मुजावर 9422047504