
प्रतिनिधी | कुडाळ –
जावळी, महाबळेश्वरसह डोंगराळ भागातील गरजू जनतेच्या पाठिशी असलेल्या जावळी बँकेच्या चेअरमन विक्रम भिलारे यांनी बँकेला तब्बल १० कोटी रुपयांचा नफा मिळवून दिल्यानंतरही त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारावर जावळी बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे यांनी सडकून टीका करत, “बँकेच्या जडणघडणीत शून्य सहभाग असलेले संचालक मागच्या दाराने राजकारण करत आहेत,” असा थेट आरोप केला.
विशेष म्हणजे हा ठराव आणणाऱ्यांमध्ये असलेले संचालक चंद्रकांत गवळी त्यांनी दुसऱ्या एका संचालकासह हा “कुटिल डाव” आखल्याचा आरोप मानकुमरे यांनी केला आहे.
📌 “सातारचा संचालक जावळी बँकेत कशासाठी?” असा थेट सवाल करत वसंतराव यांनी भोसले नावाच्या दुसऱ्या संचालकाचा देखील नामोल्लेख करत, “अमित कदम यांना शिवेंद्रसिंह राजेंच्या विरोधात मदत केली, आता आम्ही त्यांना सरळ करणारच!” असा थेट इशारा दिला.
🗣️ सहकार परिषदेतून मानकुमरे यांनी फटकारलेले हे शब्द म्हणजे भविष्यातील स्फोटक राजकीय घडामोडींचा संकेत मानला जात आहे.
“जे सहकाराच्या नावाखाली बँकेच्या स्थैर्यावर घाला घालत आहेत, त्यांना आम्ही सहकारातून हाकलूनच देऊ!” असे सांगत त्यांनी भोसले आणि गवळी या दोघांनाही सरळ शब्दांत लक्ष्य केले.
या वादामुळे सध्या जावळी बँकेत मोठी धुसफूस निर्माण झाली असून, पुढील काही दिवसांत बँकेतील राजकीय संघर्ष चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
📍 सहकारातून सडवू!
📍 बँकेवर राजकारणाचे ग्रहण!
📍 जनतेच्या बँकेत सत्तासंघर्षाचा धुरळा!
➡️ संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता जावळी बँकेतील पुढच्या हालचालींकडे लागले आहे!