दर्जेदार नेतृत्वाची निवड! – संदीप परामणे यांची जावळी तालुका भाजप अध्यक्षपदी बिनविरोध निवड,ना शिवेंद्रसिंहराजेंच्या हातून नियुक्तीपत्र”


“दर्जेदार नेतृत्वाची निवड! – संदीप परामणे यांची जावळी तालुका भाजप अध्यक्षपदी बिनविरोध निवड, शिवेंद्रसिंहराजेंच्या हातून नियुक्तीपत्र”


कुडाळ (प्रतिनिधी) –
जावळी तालुक्यात भाजप पक्षाच्या नव्या ताकदीचे नेतृत्व आज स्पष्ट झाले! सोमर्डी (ता. जावळी) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालयाचे अध्यक्ष संदीप प्रतापराव परामणे यांची भाजप तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री व सातारा-जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संदीप परामणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या निवडीची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केली. यावेळी अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक कार्य, उत्तम जनसंपर्क आणि अभ्यासू दृष्टिकोन यामुळे संदीप परामणे हे जावळी तालुक्यात एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय चेहरा ठरले आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करून राज्यसेवेची दारे खुली केली आहेत. त्यांच्या वडिलांची – कै. प्रतापराव परामणे – बाजार समितीत उपसभापती म्हणून ओळख असताना, श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय होते. हा राजकीय वारसा आता दुसऱ्या पिढीत सशक्तपणे उतरला आहे.

या निवडीनंतर संदीप परामणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की,
“माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी मी संधी म्हणून घेत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यात भाजप पक्षाची घरोघरी, वाडी-वस्तीत, तळागाळात घुमवू!”

या निवडीचा तालुक्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद असून, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, आणि प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी नेतृत्व करून हा निर्णय प्रभावीपणे पुढे नेला.

भाजप पक्षाच्या वाढत्या विस्तारात संदीप परामणे यांचे नेतृत्व तालुक्याच्या राजकारणात नवे वळण देईल, असा विश्वास तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!