“थंडीत उबदार मायेची भेट देत जनतेच्या हृदयावर राज्य करणारा नेता — सौरभ बाबा शिंदे”

कुडाळ –प्रतिनिधी
प्रत्येक सामान्य माणसाच्या सुख-दुःखात साथ देणारे, सर्वांचे लाडके युवा नेतृत्व आणि प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. सौरभ बाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचे एक हृदयस्पर्शी उदाहरण कुडाळमध्ये पाहायला मिळाले. सौरभ बाबा शिंदे युवा मंच यांच्या वतीने कुडाळ शहरासह परिसरातील विविध कुटुंबांना ‘मायेची उबदार भेट’ म्हणून ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. थंडीच्या कडाक्यात सामान्य कुटुंबांना उब मिळावी, हाच या उपक्रमामागील वास्तव हेतू होता.

या कार्यक्रमात सौरभ बाबा शिंदे यांनी स्वतः प्रत्येक कुटुंबाची भेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवस साजरा करण्याची ही केवळ औपचारिकता नसून सामान्य माणसाशी नाळ जुळवण्याचा खरा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. त्यांची ही साधी, सहज आणि लोकाभिमुख वृत्तीच त्यांना आज जनतेच्या हृदयात स्थान देत आहे.

साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनात आणि शेतकऱ्यांना दिलेल्या दिलासादायक धोरणांमुळे सौरभ शिंदे यांचे नाव आज प्रतापगड पट्ट्यात श्रमवंत व प्रामाणिक नेतृत्व म्हणून घेतले जाते. गेल्या काही वर्षांत त्यांनी कारखान्याच्या कामकाजात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कारखान्याला नवसंजीवनी मिळवून दिली. शेतकऱ्यांना वेळेवर गळीत हप्ता, कामगारांसाठी सुरक्षितता उपाय, तर तरुणांसाठी रोजगार संधी—या सर्व निर्णयांमुळे त्यांचे नेतृत्व अधिक भक्कम झाले आहे.

युवा पिढीला दिशा देणारे, शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, पर्यावरण उपक्रम अशा समाजहिताच्या कार्यात सौरभ शिंदे नेहमी आघाडीवर असतात. युवकांच्या प्रत्येक स्वप्नाला हात देणारा नेता म्हणजे सौरभ बाबा अशी त्यांची ओळख आज गावोगावी तयार झाली आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने झालेला ब्लॅंकेट वितरण उपक्रम हा केवळ सामाजिक कार्यक्रम नव्हता, तर ‘नेतृत्व म्हणजे सेवा’ या विचाराची जिवंत प्रचिती देणारा प्रसंग होता. सर्वसामान्यांच्या मनात आदर, आपुलकी आणि विश्वासाचे जे हृदय सिंहासन सौरभ शिंदे यांनी निर्माण केले आहे, ते अशाच उपक्रमांतून अधिक दृढ होत आहे.

कुडाळमध्ये आज एकच चर्चा—
“नेतृत्व असं असावं… जे स्वतःच्या वाढदिवशीही लोकांच्या घरात मायेची उब घेऊन येतं.”

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!