तडीपार आरोपींचा गावात वावर; उंब्रज पोलिसांची धडक कारवाई(व्हिडीओ)


कराड | Aim Media प्रतिनिधी: हेमंत पाटील

उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतून तडीपार करण्यात आलेले दोन सराईत गुन्हेगार गावात परतल्याची गोपनीय माहिती मिळताच, उंब्रज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उंब्रज पोलिसांचा मोठा टेम्पो असल्याचे दिसून आले आहे.

तडीपार आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

  • गणेश बाळासाहेब कांबळे (वय २९)
  • अभय जनार्दन चव्हाण (वय २१)

दोघेही पेरले, ता. कराड येथील रहिवासी असून, यांच्यावर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत दोन वर्षांसाठी तडीपारची कारवाई करण्यात आली होती (जा. क्र. स्थागुशा/05/23/ मपोकाक 55/2581/23).

कशी झाली कारवाई?

उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी धोकादायक गुन्हेगारांवर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी API रविंद्र भोरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की तडीपार गुन्हेगार पेरले गावात वावरत आहेत.

यावरून त्यांनी तातडीने दोन पथके बनवून कारवाई केली आणि आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा नं. ३७१/२०२५ व ३७२/२०२५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाईतील अधिकारी:

  • API रविंद्र भोरे
  • HC संजय धुमाळ
  • PC विकास शिंदे
  • PC राजू कोळी
  • PC श्रीधर माने
  • महिला पोलीस शिपाई भगत
  • तपास अधिकारी: हवालदार युवराज पवार

उंब्रज पोलीसांची ही कारवाई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता व सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.



aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!