
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ठिबक सिंचन योजनेंवरील जीएसटी कमी – आता फक्त ७% मध्ये उपलब्ध
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ठिबक सिंचन योजनेंवरील जीएसटी कमी – आता फक्त ७% मध्ये उपलब्ध
(इम्तियाज मुजावर)….जावळी तालुक्यातील कुडाळ येथील सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेता फार्म इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या अधिकृत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना आता ठिबक सिंचन व स्प्रिंकलर यंत्रणा अतिशय कमी दरात उपलब्ध होणार आहे.
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार, ठिबक सिंचनावर जीएसटी १२ टक्क्यांवरून केवळ ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नेटाफिम ठिबक अवघ्या ७ टक्के जीएसटीवर आता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्राचे प्रमुख विवेक शिंदे (राहणार आखाडे, ता. जावळी) यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आता अनुदान तत्त्वावर कृषी विभागाच्या माध्यमातून ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, तसेच लागणाऱ्या सर्व प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त पाईप्स आणि साहित्य येथे उपलब्ध करून दिले जात आहे.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, फार्मर आयडी, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक यांसह थेट सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क – ९९२२६४१०३८
विवेक शिंदे म्हणाले:
“पाण्याची बचत करून आधुनिक शेती करणे हे काळाची गरज आहे. ठिबक सिंचन योजना आता स्वस्त आणि सहज उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आपल्या शेतीचे आधुनिकीकरण करावे.”
शेतकऱ्यांनो, पाणी वाचवा – आधुनिक ठिबक सिंचन वापरा!
सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र, कुडाळ – तुमच्या शेतीसाठी विश्वासाचा पत्ता!



