झोलाची खिंड रस्त्याचे काम सुरू – महाबळेश्वर-तापोळा मार्गावर दरड कोसळली, वाहतूक वळवली!

🛑 ब्रेकिंग न्यूज |

झोलाची खिंड रस्त्याचे काम सुरू – महाबळेश्वर-तापोळा मार्गावर दरड कोसळली, वाहतूक वळवली!

महाबळेश्वर ते तापोळा रस्त्याची पाहणी पूर्ण – जेसीबीच्या मदतीने आपत्कालीन दुरुस्ती सुरू, पावसामुळे अडथळे कायम

महाबळेश्वर:
महाबळेश्वर–तापोळा दरम्यानच्या झोलाची खिंड भागातील खचलेला रस्ता सध्या दुरुस्तीच्या प्रक्रियेत असून, संपूर्ण २७ किमी रस्त्याची पाहणी नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.

या पाहणीत १०० मीटर घाट लांबीच्या काही ठिकाणी दरड रस्त्यावर आल्याचे निदर्शनास आले असून, ३ जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने रस्ता सुस्थितीत आणण्याचे काम वेगात सुरू आहे.


दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहतूक सध्या मांघर–पारुट मार्गे वळवण्यात आली आहे.
मात्र, पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याने कामात अडथळे येत आहेत, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अनावश्यक प्रवास टाळावा

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!