जैविक निविष्ठा निर्मितीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम जावळी तालुक्यात उत्साहात

जैविक निविष्ठा निर्मितीविषयक प्रशिक्षण कार्यक्रम जावळी तालुक्यात उत्साहात

अकोला येथील सर्ग विकास समितीच्या मार्गदर्शनाखाली, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा व तालुका कृषि अधिकारी जावळी यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेंतर्गत गटातील शेतकऱ्यांसाठी जैविक निविष्ठा निर्मिती कार्यक्रम मौजे–सोमर्डी (ता. जावळी) येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षणामध्ये सर्ग विकास समिती अकोला येथील तज्ञ मार्गदर्शक श्री. शिवाजी भारती यांनी शेतकऱ्यांना S9 कल्चर, बायोडायनॅमिक कम्पोस्ट, तरल खाद, कीटकनाशक निर्मिती, त्याचे फायदे व वापर पद्धती याबाबत सखोल माहिती दिली. नैसर्गिक शेती पद्धतीत जैविक निविष्ठांचे महत्त्व आणि उत्पादन खर्च कमी करण्यास त्यांचा होणारा लाभ यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला.

कार्यक्रमास श्री. पांडुरंग खाडे (सहाय्यक कृषि अधिकारी, सोमर्डी), आत्मा बी.टी.एम श्री. एस. बी. नेवसे, तसेच योजनेअंतर्गत समाविष्ट गटातील सर्व शेतकरी सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन आत्माचे तालुका प्रमुख श्री. एस. बी. नेवसे यांनी केले.

जावळी तालुक्यात जैविक शेतीविषयी जागरूकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला असून शेतकऱ्यांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!