जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प सातारा अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) योजना प्रचार- प्रसार व लाभार्थी नोंदणी अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा

जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प सातारा अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) योजना प्रचार- प्रसार व लाभार्थी नोंदणी अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा आज दिनांक १८ ऑगस्ट २०२३ तालुका कृषि अधिकारी कार्यालय जावली येथे आयोजित करण्यात आली

मा. श्री विकास बंडगर, प्रमुख, जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक आत्मा सातारा यांचे अध्यक्षते खाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळेस श्री. संजय घोरपडे तालुका कृषि अधिकारी, जावली, श्री. बी. एस. बुधावले तालुका कृषि अधिकारी, महाबळेश्वर, श्री. शशिकांत घाडगे पुरवठा साखळी व मुल्यसाखळी तज्ञ स्मार्ट सातारा, श्री. नितीराज साबळे जिल्हा अग्रणी बँक प्रतीनिधी सातारा, श्री. आण्णासाहेब फरांदे सातारा जि. म. स. बँक विभागीय अधिकारी, श्री. राजेंद्र गोर्डे, अर्थशास्त्रज्ञ तथा वित्त प्रवेश सल्लागर स्मार्ट सातारा, श्री. अजय पोळ, संगणक चालक स्मार्ट सातारा व तालुक्यातिल सर्व बँक अधिकारी/प्रतीनिधी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, बीटीएम, व तालुक्यातिल कर्मचारी, शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, बचत गटाचे प्रतिनिधी, कृषी उद्योजक सुशिक्षित बेरोजगार युवक, प्रगतीशील शेतकरी, कृषी पदवीधर, प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे (PACS) अधिकारी, नागरी सेवा केंद्रांचे चालक उपस्थित होते.
कृषि पायाभूत सुविधा निधी योजनेचे सादरीकरण श्री. राजेंद्र गोर्डे, अर्थशास्त्रज्ञ तथा वित्त प्रवेश सल्लागर स्मार्ट सातारा यांनी केले तसेच श्री. मेघनाथ कांबळे, महाराष्ट्रा राज्य समन्वयक (AIF) कृषि संचालक (आत्मा), कृषि आयुक्तालय पुणे, यांनी ऑनलाइन द्वारे मार्गदर्शन केले.
कार्यकमाचे प्रस्ताविक श्री. शशिकांत घाडगे पुरवठा साखळी व मुल्यसाखळी तज्ञ स्मार्ट सातारा यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. संजय घोरपडे तालुका कृषि अधिकारी, जावली यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन सचिन नेवासे, BTM जावली यांनी केले.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!