
कुडाळ (प्रतिनिधी) जावळी तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (महाराज साहेब) यांचे विश्वासू सहकारी आणि प्रतापगड सहकारी साखर कारखाना चे चेअरमन सौरभ शिंदे (बाबा) यांची जावळी पंचायत समितीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
नियुक्ती समारंभात सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते सौरभ शिंदे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य गोरख महाडीक तसेच चारूशिलाताई पवार उपस्थित होते. पदभार स्वीकारताना सौरभ शिंदे यांनी जावळी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कुडाळ जिल्हा परिषद गट मध्ये प्रभावी कामगिरी करत हा कुडाळ गट शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणण्यात यश आले. मागील पंधरा वर्षांपासून या गटावर प्रभावी वर्चस्व नव्हते , या विजयात सौरभ शिंदे यांच्या संघटन कौशल्याचा आणि जनसंपर्काचा सिंहाचा वाटा मानला जात आहे.
जावळी तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून सौरभ शिंदे यांचा वाढता प्रभाव आणि लोकप्रियता लक्षात घेता त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर विकासाभिमुख भूमिका, कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि संघटन विस्तार यामुळे त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे.
, आगामी काळात जावळी तालुक्यातील राजकीय दिशा ठरवण्यात सौरभ शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील संघटन बळकट करून व्यापक जनसमर्थन उभारण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या नियुक्तीमुळे जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक सक्रिय झाले असून, विकासाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करून पुढील काळात ठोस निर्णय आणि उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



