
जावळी तालुक्याला मिळणार ज्ञानाचं नवं मंदिर — संदीप परामणे यांच्या प्रयत्नांना नामदार शिवेंद्रसिंहराजेंचं बळ!
जावळी तालुक्याच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचं आणि वाचनाचं प्रतीक ठरणारं “नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक वाचनालय” आता नव्या, भव्य आणि आधुनिक इमारतीत झळकणार आहे. तालुक्यातील युवकांसाठी शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि आत्मविकास यांचा दीपस्तंभ ठरलेले वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप परामणे यांच्या चिकाटी, दूरदृष्टी आणि समर्पणातून ही परिवर्तनयात्रा सुरू झाली आहे.

अत्यंत छोट्या गावात संदीप परामने यांच्या माध्यमातून अवघ्या ७० पुस्तकांपासून सुरू झालेली ज्ञानक्रांती नेताजी सुभाष चंद्र बोस सार्वजनिक वाचनालय आज खऱ्या अर्थाने अनेक क्लास वन क्लास टू या प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कारकिर्दीला मुहूर्तमेढ रोणार हे वाचनालय ठरला आहे

साध्या घरगुती शेल्फवरील फक्त ७० पुस्तकांपासून सुरू झालेलं हे वाचनालय आज हजारो ग्रंथांचं ज्ञानभांडार बनलं आहे. संदीप परामणे यांच्या अथक प्रयत्नांनी तालुक्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकले — तलाठी, पोलीस भरती, गटविकास अधिकारी आणि इतर प्रशासकीय पदांवर पोहोचलेले हे विद्यार्थी आज समाजसेवेची नवी दिशा देत आहेत.

शिवेंद्रसिंहराजेंचं पाठबळ — २५ लाखांचा निधी मंजूर!
वाचनालयाचं स्वप्न आता वास्तवात उतरत आहे. बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून आणि संवेदनशील नेतृत्वातून तब्बल २५ लाखांचा निधी या वाचनालयासाठी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सुशोभित, सुसज्ज आणि विद्यार्थी-मैत्रीपूर्ण अशी आकर्षक इमारत उभी राहणार आहे — जी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल.

भव्य भूमिपूजन सोहळा
या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा शनिवारी सायंकाळी ५ वाजता बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व जावळी तालुक्याचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्याचबरोबर सोमर्डी–शेते विकास सोसायटी इमारतीचं उद्घाटन व म्हसवे गटातील कार्यकर्ते व बहिणींचा संवाद सोहळा देखील पार पडणार आहे.
संदीप परामणे म्हणजे — शिक्षण, समाजसेवा आणि नेतृत्वाचा संगम
संदीप परामणे यांनी वाचनालयासोबत समाजजागृतीचं कार्यही जिद्दीने केलं आहे. शिक्षणातून परिवर्तन घडविण्याचा त्यांचा विश्वासच आज या यशामागचं बळ आहे. त्यांचं नेतृत्व केवळ वाचनालयापुरतं मर्यादित नाही — ते जावळी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र बनलं आहे.
भाजप तालुका अध्यक्ष व वाचनालयाचे मुख्य संस्थापक संदीप परामने यांचे जनतेस आवाहन
या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास तालुक्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक आणि मान्यवरांनी उपस्थित राहावं, अशी नम्र विनंती भाजप जावळी तालुका अध्यक्ष संदीप परामणे यांनी केली आहे.
“ज्ञान, जनसंपर्क आणि जनहित — या त्रिसूत्रीवर उभारलेला संदीप परामणे यांचा प्रवास आता जावळीच्या विकासाचा दिशा-दर्शक ठरत आहे!”



